राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील पत्रकार जावेद भाई शेख यांच्या मिरावली कलेक्शन & कॉस्मेटिक, जनरल स्टोअर्स नवीन दुकानांचे उद्घाटन अ.नगरच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती मनिषा राशिनकर मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जावेद भाई शेख यांच्या मिरावली कलेक्शन & कॉस्मेटिक, जनरल स्टोअर्स नवीन दुकानाच्या माध्यमातून वरवंडी या गावात एकाच दुकानात शालेय स्टेशनरी, गिफ्ट, लहान बालकांचे खेळणे व 1 ते 15 वर्षापर्यंतच्या बालकांचे ड्रेसेस व साडया हे सर्व एकाच दुकानात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व या दुकानास भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी पत्रकार जावेद शेख, चाँदभाई शेख, असिफ शेख, रेहाना शेख, आफसना शेख, आवेज शेख, असिम शेख, आरशान शेख, समीर शेख, अफोज शेख,गोरख अडसुरे, सलीम शेख, सरपंच भाऊसाहेब कोळेकर, गा.पं.सदस्य बंटी अडसुरे, पप्पु बर्डे , अजीजभाई शेख, सुनिल कुसमुडे, अशोक थोरात, फारूख शेख,राजु शेख,अमीर शेख,सादिक शेख, कय्युम शेख, तन्वीर शेख, हसण शेख, तौफिक शेख व क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे व पत्रकार रमेश खेमनर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार जावेद भाई शेख यांच्या मिरावली कलेक्शन & कॉस्मेटिक, जनरल स्टोअर्सचे उपजिल्हाधिकारी मनिषा राशिनकर यांच्या हस्ते उद्घाटन

0Share
Leave a reply