इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूलची 5 फेब्रुवारी 2024 रोजी इयत्ता HKG ते चौथी च्या विद्यार्थ्याची सहल आयोजित केली होती. ही सहल इतर सहलीपेक्षा वेगळी होती कारण या सहलीत विद्यार्थी बरोबर त्याचे पालक ही सहभागी करून घेतले होते. खडकी येथून सकाळी ६ वाजता सहल मार्गस्थ झाली यावेळी संस्थेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करण्यात आले व सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना शुभेच्या देण्यात आल्या.
सहलीत पहिला थांबा केतकवळे बालाजी येथे घेण्यात आला. सहलीत सहभागी सर्वांनी बालाजी येथे देवदर्शन घेतले व सहल पुढे मार्गस्थ झाली. सहलीत सहभागी विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असलेले ठिकाण आले प्रथमेश रिसॉर्ट वाटर पाकॅ. येथे प्रथम सर्वांना अल्पोहार देण्यात आला नंतर मुलांना ऍडव्हेंचर गेम येथे नेण्यात आले. सर्व मुलांनी व पालकांनी गेम चा आनंद घेतला. यानंतर मुलांना रेन डान्स व वॉटर पार्क कडे खेळायला सोडण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी यथोच्या खूप आनंद लुटला. आता दुपार झाली होती सर्वाच्यात पोटात कावळे ओरडायला लागले होते. त्यामुळे सर्वांनी भोजनाचा आनंद घेतला यावेळी लहान मुले असल्यामुळे त्याच्या आवडीचे पदार्थ जेवणात देण्यात आले होते तसेच खूप खेळून झाले असल्यामुळे सर्व मुलांनी जेवणावर ताव मारला. यानंतर इंडोर गेमसाठी मुलांना खेळायला नेले याठिकाणी सर्व विद्यार्थी व पालक यांनी खेळाचा आनंद घेतला. त्यानंतर मुलांना जादूचे प्रयोग दाखवण्यात आले मुलांनी जादूचे प्रयोग खूप आवडीने बघितले जादूचे प्रयोग बगून झाल्यावर सर्व विद्यार्थ्यासाठी मोठ्या आवाजात दोन गाणी लावण्यात आली. या गाण्याच्या तालावर ठेका धरून आनंद लुटला. आता ५ वाजले होते प्रथमेश रिसॉर्ट तर्फे मुलांना व पालकांना फ्रुटी देण्यात आली. प्रथमेश रिसॉर्टचा निरोप घेण्यात आला व सहल पुढे मार्गस्थ झाली यानंतर एक दत्त नारायणपूर येथे दर्शनासाठी सहल थांबवण्यात आली. सर्वांनी दर्शनाचा आनंद घेतले व सहलीचा परतीचा प्रवास चालू झाला संध्याकाळी ८ वाजता खडकी येथे सहल पोहचली. यावेळी पालकाच्या बोलक्या प्रतिक्रिया आल्या पालक या सहलीतील मौज – मस्तीने भारावून गेले होते कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात दोन क्षण आनंद घालवायचे किंवा निवांत बसायचे म्हंटले तरी होत नाही पण आज शाळेमुळे आजचा दिवस लहानपणी सारखा खूप आनंदी असा होता उद्या काम करताना कंटाळा येणार नाही कारण आज दिवसभर चार्जिंग झालीली आहे. इतर शाळेप्रमाणे सहल आयोजित न करता पालकांनीही सहलीत सहभागी करून घेतल्याबद्दल आभार मानले व सर्व जण आपापल्या घराकडे मार्गस्थ झाले.
सदर सहल यशस्वी होण्यासाठी शाळेचे पदाधिकारी, प्राचार्य व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
Leave a reply