Disha Shakti

इतर

टाकळीढोकेश्वर बनाई देवी यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी विक्रम झावरे तर उपाध्यक्षपदी सुनील चव्हाण 

Spread the love

 विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वर पंचक्रोशीतील सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले जागृत देवस्थान बनाईदेवी यात्रा कमिटीची बैठक गावाच्या वेशीसमोरील पारावरती नुकतीच खेळीमेळीच्या वातावरण पार पडली, यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी विक्रम झावरे तर उपाध्यक्षपदी सुनील चव्हाण सर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दिवशी टाकळीढोकेश्वर परिसरातील सर्वात मोठा बनाई देवी यात्रा उत्सव ११ ते १४ एप्रिल या कालावधीत साजरी होणार आहे.

यात्रा कमिटीच्या बैठकीमध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ती पुढीलप्रमाणे अध्यक्ष विक्रम झावरे,उपाध्यक्ष सुनील चव्हाण सर, सचिव पत्रकार वसंत रांधवण, खजिनदार अंकुश पायमोडे, सह खजिनदार मळिभाऊ रांधवण, संपतराव तराळ, गंगाधर बांडे, जयसिंग झावरे सेक्रेटरी प्रकाश ईघे, युवा संघटक बबलू झावरे, सल्लागार म्हणून रावसाहेब झावरे सर,राजुशेठ भंडारी,भाऊसाहेब झावरे सर,महेश पाटील, बबनराव सावळेराम पायमोडे, बबन हरिभाऊ बांडे, भास्कर पायमोडे, बंडूशेठ रांधवण, बबनराव सोनबा बांडे तर प्रसिद्ध प्रमुखपदी पत्रकार वसंत रांधवण,पोपट पायमोडे, सदस्यपदी संजय खिलारी मेजर, सोमनाथ बांडे, शिराज हवलदार, संजय कुसकर, सचिन आल्हाट, राहुल धुमाळ, राजू झावरे,गणेश ठुबे, विष्णू झावरे, नवनाथ पायमोडे, विकास आल्हाट, युवराज खिलारी, प्रशांत तराळ, अनिल क्षिरसागर, राहुल झावरे, राहुल जाधव, संतोष क्षिरसागर युसुफ हवलदार, राजेंद्र झावरे, किसनराव पायमोडे, महेबुब शेख, गुलाब भाई, सुशांत आल्हाट,संपत धुमाळ, संतोष जाधव, प्रताप झावरे, यांचा समावेश आहे. यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या चार दिवसीय होणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनाचे, बैलगाडा शर्यतींचा कार्यक्रम आयोजित केले आहे. याप्रसंगी निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी होणाऱ्या यात्रेची रुपरेषा सांगितली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!