Disha Shakti

सामाजिक

शिंदोडी येथे महाशिवरात्री व विर एकलव्य जयंती मोठया थाटामाटात संपन्न

Spread the love

प्रतिनिधी / शेख युनूस : संगमनेर तालुक्यातील शिंदोडी गावात वंचित बहुजन आघाडी च्या प्रणित महाशिवरात्री व विर एकलव्य जयंती ही मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.  सविस्तर माहिती अशी की, महाशिवरात्र ह्या दिवशी भगवान शंकराचे किंवा महादेवाचे भक्त उपवास करतात शंकराची पूजा करतात. महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र. शिव आणि पार्वतीच्यालग्नाचे स्मरण करतो आणि या प्रसंगी शिव त्यांचे दैवी तांडव नृत्य करतो. शिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे, जो जीवनात आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे स्मरण आहे. महाशिवरात्री दिवशी शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना, उपवास, नैतिकता आणि सदगुणाचे मनन करून साजरा केला जातो.

शिंदोडी गावातील आदिवासी बांधवानी आणि वंचित आघाडीच्या वतीने मोठया जल्लोषात वीर एकलव्य जयंती साजरी केली. वीर एकलव्य जयंती निमित्त संगमनेर तालुक्यातील, राहुरी तालुक्यातील विविध मान्यवरांनी वीर एकलव्य यांच्या फोटोला पुष्पहार घालून, पूजन करून शिंदोडी गावात जल्लोषात वीर एकलव्य जयंती साजरी केली. आपण आपल्या ध्येयावर दृढ नीश्वय केला आहे आणि आपल्याला ते पोहचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि जे स्वतः ला मदत करतात त्याना देव मदत करतो. . शिंदोडी गावात दरसाल दरवर्षी सालाबादप्रमाणे महाशिवरात्री आणि एकलव्य जयंती ही सर्व जातीधर्मातील बंधू, भगिनी, युवक तरुण एकत्रित उपस्थित राहून मोठया आनंदात आणि जल्लोषात जयंती साजरी करून आपण सर्व एकाच मायेची लेकरे आहोत आणि मानवतेचा, माणुसकीचे नाते जपून भक्ती भावाने प्रत्येक सण, जयंती आनंदाने साजरी करतात.

यावेळी प्रमुख उपस्थिती वंचित आघाडीचे डॉ.जालिंदर घिगे,संदीप कोकाटे, वंचित आघाडीचे भीमराज कुदनर, ताराचंद विघे,बाबुलाल शेख साहेब,संजय मोकळ, अजीजभाई ओहरा, पत्रकार युनूस शेख, दादासाहेब बागुल, महेंद्र गायकवाड, सोपान बर्डे, संतोष बर्डे, किरण साळुंके, आतिक साळवे, पप्पू साळवे, विनायक बर्डे, विक्रम बर्डे, संतोष पवार, तुकाराम पिंपळे, रावसो. गायकवाड, अनिल नायकवाडी, सुलतान शेख, स्वप्नील कुदनर, बापू कुदनर, मच्छिन्द्र शेलार, वैभव कुदनर, विलास बर्डे, लक्ष्मण कुदनर, किशोर गायकवाड, संजय खामकर, योगेश कुदनर, संतोष पवार,आदी महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन ताराचंद विघे यांनी केले, आणि आभार दादासाहेब बागुल यांनी मानले. कार्यक्रम पार पडल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी जेवणाचा आस्वाद घेतला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!