मुंबई कांदिवली प्रतिनिधी / भारत कवितके : रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत कांदिवली पश्चिम येथील शुभम गार्डन पार्टी सभागृह, गणेश चौक, महावीर नगर, लिंक रोड जवळ, कांदिवली पश्चिम मुंबई 67 या ठिकाणी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे.धनगर आरक्षणाच्या उच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन लढाईच्या पुढील अंतिम टप्प्यातील भूमिका घेणे, तसेच राज्य भर संघटना शक्तीशाली बनविणे आणि जमातीच्या भविष्यासाठी आव्हानात्मक भूमिका घेणे.
यासाठी महत्त्वाची राज्य स्तरीय सभा आयोजित करण्यात आले असल्याचे महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचातर्फे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. या राज्य स्तरीय सभेला सर्व आघाड्यांचे जिल्हा, तालुका, विभाग व राज्य स्तरावरील पदाधिकारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या राज्य स्तरीय सभेला काही निमंत्रित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचातर्फे राज्य स्तरीय सभेत अध्यक्ष मधुजी शिंदे , डॉ.बघेल सर,व पाचपोळ सर मार्गदर्शन करणार आहेत. धनगर समाज बांधवांनी या राज्यस्तरीय सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचातर्फे पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
Leave a reply