होळकर वंशाचे प्रवर्तक… मल्हारराव होळकर
जय मल्हार समाज बांधवांनों, १६ मार्च १६९३ साली पुणे शेजारील जेजुरी जवळील होल या गावी धनगर समाजात झाला. मल्हारराव होळकर हे मालवाचे पहिले मराठा सुभेदार होते. मल्हारराव होळकरांना होळकर वंशाचे प्रवर्तक मानले जाते.मल्हारराव होळकर हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे सासरे होते.त्यांचा मुलगा खंडेराव यांचेशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा विवाह झाला होता.खंडेरावांना कुंभोरी च्या युध्दात वीरमरण आले, त्यावेळी मल्हारराव होळकर यांनी लोकहितासाठी राज्य कारभार करण्यासाठी अहिल्याबाई होळकर यांना सती जाऊ दिले नाही.मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाई होळकर यांना युध्दाचे शिक्षण, युध्दाचे बारकावे, गणित सोडविणे, न्यायदानाचे काम,पत्र व्यवहार, इत्यादी गोष्टींत तरबेज केले, मल्हारराव होळकर यांच्या चार बायका होत्या. गौतमाबाई, हरकूबाई, व्दारकाबाई आणि राजाबाई मध्यप्रदेश मधील मालवा पासून पंजाब पर्यंत मल्हारराव होळकर यांचे साम्राज्य होते.मल्हारराव होळकर यांचा मृत्यू २० में १७६६ रोजी आलमपूर या ठिकाणी झाला.१६ मार्च २०२४ रोजी मल्हारराव होळकर यांची ३३१ वी जयंती त्या निमित्ताने विनम्र अभिवादन.