Disha Shakti

सामाजिक

ढवळपुरी येथील धन्वंतरी महाविद्यालयात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील धन्वंतरी कला व विज्ञान महाविद्यालयात महिला दिनानिमित्त महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माननीय चौधरी मॅडम (वन अधिकारी टाकळी ढोकेश्वर) यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबतच प्रमुख पाहुणे म्हणून सावंत मॅडम व दाभाडे मॅडम (वन अधिकारी) यांनी देखील विद्यार्थ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत मुलींनी व महिलांनी आपली मानसिकता बदलावी असा मोलाचा संदेश यावेळी दिला. कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक जमील शेख सर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व महिलांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच महाविद्यालयाची विद्यार्थिनी समीरा शेख हिची इंडियन नेव्ही मध्ये निवड झाल्याबद्दल तिचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी मीतांक्षा भोंडवे हिने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे जमील शेख सर यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रम सह अधिकारी प्रा. जयश्री भोंडवे मॅडम, प्रा. कावेरी गवते मॅडम, प्रा. किरण करंडे सर, प्रा. योगेश भुसारी सर, प्रा. अतुल मोरे , प्रा. सागर वाव्हळ ,प्रा. विशाल काळे ,प्रा. राहुल शेलार, प्रा. रोहित जाधव, प्रा. अनिल पवार, शिक्षकेतर कर्मचारी श्री .फारुख राजे, श्री. गणेश देशमुख, श्री.अभिजीत किंनकर, श्री. वैभव गावडे, श्री .शुभम गायकवाड ,श्री .मोहित गोरड, सर्व विद्यार्थी, यावेळी उपस्थित होते. ‌


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!