दिशाशक्ती प्रतिनिधी / खंडू कोळेकर : महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कमलेश पगार सर तसेच आभार प्रदर्शन श्रीमती नूतन मुळणकर मॅडम यांनी केले. श्रीमती सुनंदा पाटील मॅडम यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले तसेच मुख्याध्यापक श्री अजित इंगळे सर यांनी मनोगत व्यक्त करून सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. कौशल्या सुनिल निकम तसेच प्रमुख पाहुणे सौ.कविता संग्राम बागुल आणि श्रीमती रत्नमाला बोरसे मॅडम यांनी भूषविले . इयत्ता सहावी , सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गायन करून त्यांचे स्वागत केले. नियोजनानुसार इयत्ता सहावी, सातवीच्या विद्यार्थ्यांकडून नृत्य सादरीकरण करण्यात आले. तसेच महिलांनी आणि विद्यार्थ्यांनी संगीत खुर्ची खेळ खेळण्याच आनंद घेतला अश्याप्रकारे, जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी गावातील महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
Leave a reply