राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : मागील काळात राहुरी पोलीस स्टेशन येथे दाखल असणाऱ्या विविध मिसिंग मधील व्यक्तींची शोध मोहीम राबवून 26 महिला व 22 पुरुष यांचा शोध घेण्यात आला असून संबंधितांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच तेरा अपहरण झालेल्या मुलींचा हिशोब घेऊन त्यांनाही त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.अशाप्रकारे अद्याप पर्यंत एकूण 39 महिला व मुलींचा व 22 पुरुषांचा शोध घेण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर, श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो.उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वात सहा.पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, सपोनी गणेश चव्हाण, पोसई चारुदत्त खोंडे, पोसई समाधान फडोळ, पो.हे.कॉ.सुरज गायकवाड, पो.हे.कॉ.राहुल यादव, पो.हे.कॉ.विकास साळवे, पो.हे.कॉ. पाखरे पो.ना.प्रविण आहिरे, गोपनीय शिंदे, पो.ना.प्रविण बागुल, पो.कॉ.प्रमोद ढाकणे, पो.कॉ.नदिम शेख, पो.कॉ.अंकुश भोसले, पो.कॉ.सतिष कुऱ्हाडे , पो.कॉ.सचिन ताजणे, पो.कॉ.गोवर्धन कदम नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर यांनी केलेली आहे.
Homeपश्चिम महाराष्ट्रराहुरी पोलिसांच्या विशेष मोहीमे अंतर्गत हरवलेल्या 26 महिला व अपहरण केलेल्या 13 अल्पवयीन मुली व 22 बेपत्ता पुरुषांचा शोध
राहुरी पोलिसांच्या विशेष मोहीमे अंतर्गत हरवलेल्या 26 महिला व अपहरण केलेल्या 13 अल्पवयीन मुली व 22 बेपत्ता पुरुषांचा शोध

0Share
Leave a reply