प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : वनकुटे येथे खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून धनसंपदा महिला बचत गट साहित्य वाटप करण्यात आले. दि.10 वनकुटे गावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य भास्कर शिंदे यांच्या संकल्पनेतून वनकुटे येथील धनसंपदा महिला बचत गटासाठी पाच लाख रुपयांची साहित्य वाटप त्यामध्ये स्टॉल टपरी, पिठाची गीरणी, शेवई मशीन ,गहू चिक काढणे मशीन,मसाला तयार करणे मशीन,वजन काटा व इतर विविध वस्तूंचे वाटप भास्करराव शिंदे यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी दिपक गुंजाळ,शिवाजी बरकडे, प्रशांत चौरे,बाबाजी गुंजाळ, बाबाजी इरोळे, संतोष वाबळे, नितीन साळवे, चौधरी मॅडम,वाघ मॅडम इतर महीला व पुरुष उपस्थित होते.
वनकुटे येथे खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून धनसंपदा महिला बचत गट साहित्य वाटप..

0Share
Leave a reply