Disha Shakti

सामाजिक

कांतीलाल जाडकर यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर 

Spread the love

 

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार  : महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागासवर्गीय जाती कल्याण, शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी वगैरेसाठी तसेच समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करावा सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या समाज सेवकांच्या कामाची दाद घ्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी जेणेकरून सामाजिक उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत यासाठी शासनाने सन १९७१-७२ पासून त्या व्यक्तींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार योजना सुरू केलेली आहे.

याच योजनेतून अहमदनगर जिल्ह्यात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले नगर येथिल जय मल्हार बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व पाटबंधारे विभागात 39 वर्ष उत्कृष्ट सेवा केलेली आहे.कांतीलाल जाडकर यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. जय मल्हार बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राजकीय सामाजिक पत्रकारीता सह सर्व क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या या संस्थेमार्फत त्यानां सन्मानित करून एक नवी ऊर्जा देण्याचे काम या संघटनेमार्फत केले जाते. तसेच कुणावर अन्याय झाल्यास तेथे न्याय देण्यासाठी कांतीलालजी जाडकर नेहमी अग्रेसर असतातसेवा बजावताना गोरगरीब नागरीकांना प्रथमता मदत करणे, तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर राहणे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर यांची चळवळपुढे नेण्यासाठी त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. 

त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातून मान पुन्हा एकदा उंचावली आहे. व त्यांना पुढील भावी वाटचालीस विविध क्षेत्रातील नागरिकांनी व जिल्ह्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!