बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसला असून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रोजगार हमीचे माजी तालुकाध्यक्ष गाडाजनसंपर्क असलेले तळागाळातील जनतेची नाळ जोडून असलेले डॉ. खाकय्या अप्पा स्वामी कासराळीकर यांनी माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे, गेल्या 35 ते 30 वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले रोजगार हमी योजनेचे माजी तालुकाध्यक्ष कासराळीकर यांनी खा.अशोकराव चव्हाण यांना भेटून भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे. तसेच राज्याचे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांची भेट घेतली.
त्यावेळी माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे,भाजपा शहराध्यक्ष इंद्रजित तुडमे सह आदी उपस्थित होते. पक्षप्रवेशाबद्द अनेक स्तरातून डाॅ.के.बी. कासराळीकर यांच्यावर अभियानाचा वर्षांव होत आहे.
Leave a reply