संगमनेर प्रतिनिधी / युनूस शेख : संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागातील बिरेवाडी येथील दक्ष सरपंच न्यूजचे संस्थापक अध्यक्ष माननीय पत्रकार कु. किरण पुरी यांची बहिण व उपसंपादिका तथा प्रत्येक बातमीच्या आवाजाच्या किंगमेकर पत्रकार कु. अश्विनीजी पुरी यांना नाशिक येथे उत्कृष्ट निवेदिका व उपसंपादिका पुरस्काराने निफाड दर्पण राज्यस्तरीय २०२४ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, कु. अश्विनीजी पुरी यांनी आपल्या जीवनात अचूक पाऊल टाकत आपल्या चिकाटी, जिद्दीने आणि मेहनतीने यशाचे शिखर गाठले असून कमी वयात गगन भरारी घेतली आहे. कोणत्याही क्षेत्रात अचूक पाऊल टाकून निर्णय घेतला की यश हमखास मिळते, त्यासाठी वयाचे बंधन नसून जिद्द, चिकाटी आणि धाडस जिगर निर्भीड पणा महत्वाचे असते कु.अश्विनीजी पुरी यांनी अत्यंत कमी वयात अल्पवधितच महत्वपूर्ण जबाबदारी असलेल्या पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आणि पत्रकारितेत निर्भीड, निपक्ष,बुलंद आवाजाने अन्यायावर आवाज उठवत न्याय हक्काची भूमिका डोळ्यासमोर ठेवत पत्रकार क्षेत्रात एक आगळे वेगळे स्थान निर्माण करून किंगमेकर होऊन अनेक आदर्श पुरस्कार प्राप्त केले आहेत.
कु. आश्विनीजी पुरी यांनी आपल्या मधुर, गोड, स्मित आवाजातून प्रेक्षकांच्या मनात स्थान बनवलंय. कुठल्याही क्षेत्रात पुरस्कार हे खऱ्या, मेहनती आणि आदर्श व्यक्तिमहत्व असलेल्या व्यक्तीलाच मिळते. अश्विनी पुरी यांना पुरस्कार मिळालेचे माहिती होताच संपूर्ण नाशिक, अहमदनगर, संगमनेर, साकुर पंचक्रोशितील क्षेत्रात कु. अश्विनी यांचे अभिनंदन आणि स्वागत होत आहे.
वृत्तनिवेदिका कु.अश्विनी पुरी यांना नाशिक येथे उत्कृष्ट निवेदिका व उपसंपादिका पुरस्काराने सन्मानित

0Share
Leave a reply