राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो राहुरी यांनी काढलेल्या अजामिन पात्र वॉरंट मधील आरोपी नामें 1) संपत राजाराम डेंग्रे वय 47 राहणार टाकळीमिया RCC186/2021 IPC 326. 2) मोसिन रफिक सय्यद वय 29 राहणार बारगाव नांदूर RCC 25/2018 IPC 379, 3) प्रवीण रावसाहेब आढाव वय 29 राहणार सडे RCC 38/2018 IPC 324 दि 13/03/2024 रोजी 18/00 वा.अटक करण्यात आली. मा न्यायालयाने अटक आरोपी संपत राजाराम डेंग्रे यास ७ दिवस व प्रवीण रावसाहेब आढाव यास ४ न्यायालयीन कोठडी सुनावल्याने जेल रवानगी करण्यात आली आहे.
सदर आरोपीत यांना मा. न्यायालयाने यापूर्वी समन्स काढले होते. सदर समन्सची बजावणी पोलिसांनी केली होती. समन्समध्ये सदर आरोपी मा न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांचे जामीनपात्र वारंट काढून त्याची बजावणी करण्यात आली. परंतु नमुद जामीनपात्र वॉरंटातही गैरहजर राहिल्याने मा. न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढल्याने नमुद आरोपी यांना अटक करण्यात आली होती व माननीय न्यायालयाच्या आदेशाने जेल रवानगी करण्यात आली.
तरी सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनातर्फे आवाहान करण्यात येते की मा.न्यायालयामध्ये आपल्या चालू असलेल्या केसेस बाबत आपण समन्स / जामीनपात्र वॉरंटमधे मा न्यायालयात वेळोवेळी हजर राहावे, जेणेकरून अशाप्रकारे कोर्ट कामकाजात हजर न राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट निघूनअटकेची वेळ येणार नाही.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो.पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर , श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वात सपोनी गणेश चव्हाण, सहा.पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोसई समाधान फडोळ , पो.हे.कॉ.सुरज गायकवाड, पो.हे.कॉ.राहुल यादव, पो.हे.कॉ.विकास साळवे, पो.ना.प्रविण आहिरे, पो.ना.प्रविण बागुल, पो.कॉ.प्रमोद ढाकणे, पो.कॉ.नदिम शेख, पो.कॉ.अंकुश भोसले, पो.कॉ.सतिष कुऱ्हाडे , पो.कॉ.सचिन ताजणे,पो. कॉ.अजिनाथ पाखरे, पोना गणेश सानप, म पो का वृषाली कुसळकर नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर यांनी केलेली आहे.
Leave a reply