श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : दिनांक 15/03/2024 रोजी, पहाटे 05/00 वा. सुमारास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सो. यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वार्ड नं. 01, गाँधवणी परिसरात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु, भट्टी लावुन तयार करणे चालु आहे तसचे तयार हातभट्टी दारुची विक्री चालु आहे. तसेच सदर परिसरातील नागरिकाच्या वेळोवेळी याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने, पोनि, नितीन देशमुख साो. यांनी तपास पथक व वार्ड नं. 01 चौकीचे बिट अंमलदार यांना, बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारु तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्याचा शोध घेवुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिल्याने तपास पथक व वार्ड नं.01 चौकीचे चिट अंमलदार तात्काळ गोंधवणी परिसरात रवाना होवुन, गुप्तबातमीदार यांचे मार्फतीने माहिती घेवुन सदर परिसरात छापे टाकले व कारवाई केली.
बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारु तयार करताना व विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःचे कब्जात बाळगताना मिळुन आलेले आरोपी व मुद्देमाल खालील प्रमाणे, 1)दिलीप दामू गायकवाड वय 42 वर्षे, रा. गोंधवणी गाव, बडारवाडा, वार्ड नं.01, श्रीरामपूर 2) अनिल मुकिंदा फुलारे, वय 44 वर्षे, रा. गोंधवणी गाव, वडारवाडा, वार्ड नं.01, श्रीरामपूर 3) अशोक काशिनाथ शिंदे, व वय 50 वर्षे, रा. गोंधवणी गाव, वडारवाडा, वार्ड नं.01, श्रीरामपूर 4) अशोक सिताराम गायकवाड, वय 48 वर्षे, रा. गॉधवणी गाव, वडारवाडा, वार्ड नं.01, श्रीरामपूर 5) माणिक सोनबा शिंदे, वय 49 वर्षे, रा.गोंधवणी गाव, वडारवाडा, वार्ड नं.01, श्रीरामपूर 6) आकाश उर्फ बंटी गोरख गायकवाड, वय 32 वर्षे, रा. गॉधवणी गाव, बडारवाडा, वार्ड नं.01. श्रीरामपूर 7) दिलीप नाना फुलारे, वय 47 वर्षे, रा. गाँधवणी गाव, वडारवाडा, वार्ड नं.01. श्रीरामपूर 8) लता मधुकर गायकवाड, वय 50 वर्षे, रा. गॉधवणी गाव, वडारवाडा, वार्ड नं.01, श्रीरामपूर 9) अर्जुन दौलत फुलारे, वय 41 वर्षे, रा. गॉधवणी गाव, वडारवाडा, वार्ड नं.01, श्रीरामपूर 10) रविंद्र वसंत शिंदे, वय 38 वर्षे, रा. गाँधवणी गाव, वडारवाडा, वार्ड नं.01, श्रीरामपूर
वरील नमुद आरोपी हे विनापरवाना गावठी हातभट्टी दारु तयार करताना व विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःचे कब्जात वाळगताना मिळून आले, त्याचे कडुन एकूण 7,40,920/- रु. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीना मुद्देमालासह ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्म साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोना/ रघुवीर कारखेले, पोकों/ राहुल नरवडे, पोकों/ गौतम लगड, पोकों / रमिझराजा अत्तार, पोकों/ संभाजी खरात, पोकों/अजित पटारे, पोकों/राम तारडे, मपोना/ सविता उंदरे, मपोकों / लोहाळे होमगार्ड पेठे, होमगार्ड भोसले यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकों/ आर.ए. खेडकर हे करोत आहेत.
श्रीरामपूर शहर पोलीसांची अवैध धंद्यावर धडक कारवाई विनापरवाना गावठी हातभट्टी दारुची विक्री करणाऱ्यावर छापा टाकून 7,40,920/- रु.किं.चा मुद्देमाल केला जप्त

0Share
Leave a reply