दौंड प्रतिनिधी / श्री.सुधिर लोंखडे : दौंड तालुक्यातील तीन ते चार तालुक्याच्या बॉण्ड्री वर असलेले गाव म्हणजे खानोटा या गावातील रहिवासी असलेले कैलासवासी चंद्रभागा कोंडीबा लोखंडे यांचे गेल्या वर्षी निधन झाले असता काल 14 मार्च 2024 रोजी प्रथम पुण्यस्मरण सांप्रदायिक पद्धतीने साजरी करण्यात आले. या कार्यक्रमास फुलाचे असे कीर्तन ठेवण्यात आले होते. भिगवण स्टेशनचे नामांकित कीर्तनकार ह भ प संतोष महाराज गाडेकर यांचे सुश्राव्य असे कीर्तन पार पडले कार्यक्रमास भरपूर शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील ग्रामस्थ भगिनी उपस्थित होते.
एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाणे फारच दु:खद असते. मग ती व्यक्ती कोणीही असो त्या व्यक्तिशी असलेली जवळीक, तिचे प्रेम काही केल्या आपल्याला विसरता येत नाही. अशावेळी भावनांना केवळ अश्रूंवाटेच नाही तर शब्दांतूनही मार्ग मोकळा करुन द्यावासा वाटतो. ती व्यक्ती गेल्यानंतर शब्दांच्या भावनेतून व्यक्त व्हावेसे वाटते. मुलाचे 2007 साली आजारपणामध्ये निधन झाले असता आजीचे प्रथम पुण्यस्मरणाचे सगळे नियोजन त्यांचे नातू राजेंद्र भानुदास लोखंडे यांनी केले कार्यक्रमात भोजन ठेवण्यात आलं होतं आजींचं सांप्रदायिक जीवन होतं त्या माळकरी होत्या व शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी राम नाम जप केला आजींना चार मुली आहेत ताराबाई, कौशल्य, हिराबाई, वत्सला व एक मुलगा होता.
Leave a reply