इंदापूर प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : भिगवन ग्रामपंचायतीच्या वतीने अपंग कल्याण निधीचे वाटप करण्यात आले आहे. भिगवन ग्रामपंचायत मध्ये अपंग कल्याण निधी अंतर्गत नाव नोंदणी केलेल्या ६३ लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आले सरपंच दीपिका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख, ग्रामसेवक अधिकारी दत्तात्रय परदेशी व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले ग्रामपंचायतच्या उत्पन्नाच्या पाच टक्के अंध अपंग दिव्या कल्याण निधी म्हणून खर्च करण्याची तरतूद आहे त्यानुसार हा निधी वाटप करण्यात आला आहे.
एकूण १ लाख 26 हजार वाटप करण्यात आले स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्व निधी तील पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे अपेक्षित आहे हा निधी दिव्यांगांसाठी वैयक्तिक व सामाजिक स्वरूपाच्या योजनांवर खर्च केला जात असतो यावेळी दिव्यांग लाभार्थ्यां यांना संबोधित करताना करताना सरपंच दीपिका क्षीरसागर यांनी आवाहन केले की आपल्या भागातील रहिवासी दिव्यांग बांधव असतील तर त्यांनी येणाऱ्या कालावधीत ग्रामपंचायत कार्यालय भिगवन येथे संपर्क साधून योजनेअंतर्गत आवश्यक असणाऱ्या कागदपत्राचे पूर्तता करावी व संबंधित लाभार्थी यांनी योजनेचा लाभ घ्यावा या निधी वाटप कार्यक्रम प्रसंगी सरपंच दिपिका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख ,संजय देहाडे ,पराग जाधव ,प्राध्यापक तुषार क्षिरसागर जावेद शेख, कपिल भाकरे रमेश धवडे गुरप्पा पवार व लाभार्थी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a reply