प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : ससून हॉस्पिटलमध्ये आंघोळीसाठी गेलेले चंद्रकांत महादेव लोखंडे यांना अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र सापडले असता मूळ मालक असलेल्या महिलेला त्यांनी ते मंगळसूत्र सौ.लक्ष्मी जलनिला (धोबी) यांना केले परत केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक ४ मार्च रोजी चंद्रकांत लोखंडे यांची भाची कु.ऋतुजा विभाड (मावडी) हिचा अपघात भिगवन बारामती रोड शेटफळ या ठिकाणी झाला होता त्यावेळी तिला गंभीर दुखापत झाली होती त्यावेळी तिला पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांचे मामा दि.१५ रोजी सकाळी आंघोळीसाठी गेले असता त्यांना अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र सापडले ते त्यांनी प्रामाणिकपणे सौ लक्ष्मी जलनिला (धोबी) यांच्याकडे सुपूर्त केले त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ससून हॉस्पिटलमध्ये सापडलेले अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र केले परत, चंद्रकांत लोखंडे यांच्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक

0Share
Leave a reply