विशेष प्रतिनिधी / किशोर खामगळ : झेप प्रतिष्ठान तर्फे आज नौपाडा ठाणे ट्रॅफिक कंट्रोल रूम, तीन हात नाका येथे पिण्याच्या पाण्याचे वॉटर कूलर भेट म्हणून देण्यात आले. उन्हाळ्यात पोलीस बांधवांना थंड पाण्याची सोय व्हावी आणि स्वच्छ पाणी मिळावे या हेतूने ही भेट देण्यात आली.याप्रसंगी ट्रॅफिकचे पोलीस मोहिते सर, अतुल सर, आव्हाड सर आणि इतर पोलीस बांधव उपस्थित होते.
झेप प्रतिष्ठान तर्फे चिराग मेहता यांनी कूलरसाठी समन्वय साधला तर कार्यक्रमासाठी मनोज महाडिक, डॉ.मनोज कदम आणि संतोष उतेकर आणि झेप प्रतिष्टानचे अध्यक्ष विकास धनवडे उपस्थित होते.या पूर्वीही झेप प्रतिष्ठान तर्फे ३ वॉटर कुलर पोलीस बांधवांसाठी वितरित करण्यात आले होते.या उपक्रमासाठी मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचे झेप चे अध्यक्ष विकास धनवडे यांनी मनापासून आभार मानले .
Leave a reply