श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायतअत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील युवा नेते पुणे यथे स्थायिक असलेले श्री.फारुख मुसाभाई पटेल यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र सचिवपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव अविनाश दादा आदिक व प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा.सुनिल तटकरे साहेब यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल ही अपेक्षा दिवस काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून व नाऊर,जाफराबाद,सरला गोवर्धन, रामपूर,नायगांव ई. पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Leave a reply