Disha Shakti

राजकीय

राहाता तालुक्यातील नांदूर गावास गावठाणासाठी ११ एकर जमिनिसह कोट्यावधींचा विकास निधी मंजूर

Spread the love

राहाता प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : राहाता तालुक्यातील नांदूर खुर्द व बुद्रुक गावासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आला असून राहाता तालुक्यातील नांदूरमधील गावठाण,पाणीपुरवठा योजना, घरकुल योजना, घनकचरा, नवीन रास्ते,सांडपाणी व विविध योजना व प्रकल्प,व्यवस्थापन साठी शेती महामंडळ जमिनीचे वाटप करण्याचा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला. यामध्ये नांदूर खुर्द व बुद्रुक गावासाठी 11 एकर 29 गुंठे जमीन विनामूल्य प्रदान करण्याच्या आदेश देण्यात आला.असेच अनेक अनमोल सहकार्य आमच्या नांदूर गावासाठी लाभले. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सहकार्याने नांदूर ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ नांदुर यांच्या पाठपुराव्याला यश आले. या निमित्ताने जि.प.अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटिल यांचे हि खूप खूप धन्यवाद व आभार तसेच या कामी महसूल, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वच अधिकार्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. शेती महामंडळाची जमीन मिळवण्यासाठी 40 वर्षापासूनचा लढा नांदूर गावच्या सरपंच सौ.प्रीतम विशाल गोरे यांच्या माध्यमातून करत असताना आज मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

शेती महामंडळाची जमीन मिळवण्यासाठी 40 वर्षाचा लढा श्री पुरुषोत्तम प्रल्हाद गोरे (माजी व्हाईस चेअरमन गणेश सहकारी साखर कारखाना) यांनी गणेश कारखान्यामार्फत नऊ ते दहा एकर जागेत अतिक्रमण करून बंधारे बांधले व त्याचा फायदा गावाला झाला. त्यानंतर सौ.प्रीतम विशाल गोरे यांनी गेली आठ वर्षापासून ग्रामपंचायतचा एक हाती सत्ता मिळून गावाचा विकास करण्याकामी मोठ योगदान दिले व गावाचा या विकासाला मोठे यश मिळाले. गावामधील विविध प्रकारच्या योजना व विकास कामाला गती मिळाली. नवीन ग्रामपंचायत कार्यालय, नवीन तलाठी कार्यालय, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, स्थानिक आमदार निधी तसेच इतर सर्व योजनांचा पुरेपूर उपयोग करून वाड्या वस्तीवरचे रस्ते कोट्यावधी रुपयांची कामे सध्या नांदूर गावात वेगाने चालू आहे तसेच जल जीवन मिशनची कामे व इतर सुख सुविधा यांना प्राधान्य देऊन गाव विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. यामध्ये सर्वांचे सहकार्य लाभले त्याबद्दल नांदूर ग्रामस्थ यांचे आभार.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!