Disha Shakti

सामाजिक

आळंदी येथे धनगर शक्ती मीडिया समूहातर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

Spread the love

पुणे प्रतिनिधी / किरण थोरात  : खेड तालुक्यातील आळंदी येथे शुक्रवार दि. 22 मार्च 2024 रोजी धनगर शक्ती साप्ताहिक व युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देहू फाटा, आळंदी येथे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा संपादक आकाश पुजारी यांच्यावतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आळंदी मध्ये धनगर शक्तीचे महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ॲड. सचिन जोरे (माजी न्यायाधीश) यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना सांगितले की,” समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पत्रकारांनी करावे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. अन्यायाविरुध्द पत्रकारांनी आवाज उठविला पाहिजे न्यायालयात न्याय मिळेलच हे सांगता येत नाही. हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो आहे.” तर दुसरे प्रमुख पाहुणे राहुल चिताळकर पाटील माजी नगराध्यक्ष आळंदी देवाची यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,” या माऊलीच्या आळंदी नगरीत तुमच्या पत्रकारितेची सुरुवात होते आहे. व नंतर महाराष्ट्रभर तुमच्या पत्रकारितेच्या व मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार व घडामोडी पसरणार आहे. गोरंगरिबांवर अन्याय होत असेल तर पत्रकारांनी आपल्या लेखणीतून आवाज उठविला पाहिजे. अन्यायाला पत्रकार लोकांनी वाचा फोडली पाहिजे. अन्यायग्रस्तांना आधार देण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजे. सत्य लोकांसमोर आणलेच पाहिजे. त्यासाठी कुणाला ही भिऊ नका, घरात बसू नका, धाडस करून बाहेर पडा. सत्य बाहेर काढा. परमेश्वर नक्कीच तुमच्या बाजूला असणार.” यावेळी धनगर शक्तीचे संपादक आकाश पुजारी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की,” या कार्यक्रमात मध्यंतरी खंड पडला होता पण आता तसे होणार नाही.” तर प्रमुख पाहुणे धनगर समाजाची रणरागिणी कल्याणीताई वाघमोडे यांनी आपल्या भाषणात पत्रकारांना जागृत होण्याचा सल्ला दिला. आज सरकार पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यासारख्या महिला पत्रकारांना तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आज खरी लोकशाही राहिलीच नाही याची खंत वाटते. मेंढपाळांना मारहाण होणे, शेतकऱ्यांवर अन्याय होणे. यासाठी पत्रकार लोकांनी आवाज उठविला पाहिजे.

 या पुरस्कार वितरण सोहळ्यात माजी नगराध्यक्ष राहुलशेठ चिताळकर, हनुमंत दुधाळ, विठ्ठल रूपनवर, निलेश लोंढे, अण्णासाहेब गोरे, रमेश खेमनर, विशाल भागवत, रणजित थोरबोले शिवकुमार देवकाते, व इतर पत्रकारांनी या राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करताना खंत व शोकांतिका सांगितली. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्यातील पत्रकार मोठ्या संख्यांने उपस्थित होते. यावेळी मुख्य संपादक आकाश पुजारी, रणजित थोरबोले, अमोल गावडे, गणेश देशमुख, भारत कवितके, रमेश खेमनर, कांतीलाल जाडकर, किरण थोरात, भाग्यवंत नायकुडे, सोलंकर पाटील, प्रमोद डफळ, वसंत रांधवन गजानन बंदिचोडे सह इतर मोठया संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!