इंदापूर तालुका प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : भिगवन रेल्वे स्टेशन येथे एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरू करण्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी केलेल्या रेल रोको आंदोलनातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते यातील पाच पदाधिकाऱ्यांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले व दरम्यान सायंकाळी या सर्वांचे वैद्यकीय तपासणी करीत घेत जामीन करून त्यांचे सुटका करण्यात आली यामध्ये बाजार समितीचे माजी उपसभापती पराग भाऊ जाधव, तत्कालीन सरपंच तानाजी वायसे, प्राध्यापक तुषार शिरसागर, जावेद शेख ,ग्राम सदस्य कपिल भाकरे, यांचा समावेश आहे अचानक केलेल्या या कारवाईमुळे अनेक आंदोलन करते दास्तावले होते.
कोरोना काळापूर्वी भिगवन रेल्वे स्टेशन येथे सर्व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा होता पुन्हा काळात या सर्वच गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते, याचा परिणाम या भागातील रेल्वे प्रवाशांवर मोठ्या मोठ्या प्रमाणात झाला होता एक्सप्रेस गाड्या थांबत असल्याने भिगवन व परिसरातील १५ ते २० गावातील नोकरदार, कंपनीतील कामगार, विद्यार्थी अशा अनेकांना रेल्वे प्रवास सोयीचा ठरत होता. त्याचप्रमाणे येथील अनेकांना रोजगार उपलब्ध होत होता एक्सप्रेसचे थांबे पूर्ववत करण्याची मागणी सातत्याने रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे (सुप्रियाताई सुळे) यांच्याकडे करण्यात येत होती. तरीही थांबा पुरवत होत नसल्याने २४ फेब्रुवारी रोजी भिगवन रेल्वे टेशन येथे नागरिकांनी रेल रोको आंदोलन केले होते त्यानंतर रेल्वे पोलिसांनी काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान मंगळवारी सकाळी तानाजी वायसे, कपिल भाकरे ,जावेद शेख, या तिघांना ताब्यात घेतले व दुपारनंतर पराग भाऊ जाधव व प्राध्यापक तुषार शिरसागर यांना ताब्यात घेण्यात आले या कारवाईची माहिती समजतात इतर पदाधिकारी रेल्वे स्टेशनमध्ये आले होते सायंकाळी या सर्वांची मेडिकल तपासणी करून गेट जामीन करून त्यांची सुटका करण्यात आली. जनहितासाठी आंदोलन केले होते. अनेक दिवसांची प्रवासी, नोकरदार, शेतकरी, विद्यार्थी यांची एक्सप्रेस रेल्वे गाड्यांच्या तांब्याचे मागणी होती. त्यामुळे गुन्हे दाखल केल्याची अजिबात खंत नाही, जनहितासाठी तसेच रेल्वे प्रवाशांच्या न्याय हक्कासाठी लढत राहो असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पराग भाऊ जाधव यांनी सांगितले.
Leave a reply