मुंबई कांदिवली / भारत कवितके : बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी कांदिवली येथील वांझावाडी, मथुरादास रोड, चव्हाण शाळेजवळ, कांदिवली पश्चिम या ठिकाणी ज्ञानोबा तुकाराम वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ मार्फत दुपारी 12 वाजता जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज बीजोत्सवाचे निमित्त फुले पडण्याचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी कांदिवली विभागातील पुरुष, महिला,मुले,मुली या बीजोत्सव प्रसंगी उपस्थित होते.या प्रसंगी सकाळी 10 ते दुपारी 12 बीजोत्सव निमित्त ह.भ.प.यशवंत बुवा मधुकर पाटील ठाणे यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले.किर्तना मध्ये ह.भ.प.यशवंत बुवा यांनी सांगितले की,” संतांची व्याख्या अशी आहे की,ज्यांचा अवतार जगाच्या कल्याणासाठी झाला तो संत होय.कुटुंब प्रमुख असेल तर म्हणेल मी व माझे कुटुंब, नगरसेवक असेल तर म्हणेल मी व माझा विभाग, आमदार असेल तर म्हणेल मी व माझा तालुका, खासदार असेल तर म्हणेल मी व माझा जिल्हा , मुख्यमंत्री असेल तर म्हणेल मी व माझे राज्य, पंतप्रधान असेल तर म्हणेल मी व माझा देश, आणि संत असेल तर म्हणेल मी व माझे संपूर्ण जग.गेल्या 200 वर्षांपासून ज्ञानदेव तुकाराम चार जय घोष आपण ऐकत आलो आहोत.व रामकृष्ण हरी ही म्हणतो.
माणसाच्या आयुष्यात संगत ला फार महत्त्वाचे स्थान आहे.साधु संतांची संगत आणि दादा,गुंडांची संगत, यातील फरक आपल्याला जाणवल्या शिवाय राहत नाही.आम्ही मात्र साधुसंतांच्या संगती मधले आहोत.वाल्याशी नारदाचा संगत अल्प वेळेत आला आणि त्याचा संगत परिणाम वाल्यांचा वाल्मिकी झाला.वाल्याचे नारदाच्या संगत ने सारे आयुष्य बदलून गेले.म्हणून आयुष्यात संगत महत्वाची आहे.ज्या ठिकाणी पांडुरंगाचा फोटो असतो त्यांच्या एका बाजूला तुकाराम महाराज व दुसऱ्या बाजूला संत ज्ञानेश्वर महाराज यांचे फोटो असतात.” या बीजोत्सव प्रसंगी खासदार गोपाळ शेट्टी आमदार योगेश सागर नगरसेविका संध्या दोशी, पत्रकार साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके सह इतर मान्यवर यांनी उपस्थित राहून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.दुपारी 12.30 वाजता बीजे निमित्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
भारत कवितके मुंबई कांदिवली
कांदिवली येथे ” जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज” बीजोत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न, ज्याचा अवतार जगाच्या कल्याणासाठी झाला तो संत होय – ह.भ.प.यशवंत बुवा

0Share
Leave a reply