दौंड तालुका प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : धरण उशाला कोरड कशाला अशी परिस्थिती ३ जिल्ह्याच्या बॉण्ड्रीवर असलेले, दौंड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेले खानोटा हे गाव गेल्या हंगामात पाऊस काळ कमी झाल्यामुळे उजनी धरणामध्ये अवघे ६० टक्के पाणी साठा होता परंतु उजनी धरण व्यवस्थापन विभागाने पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची भीषण टंचाई जाणू लागली लोकांना आता पुणे जिल्ह्यातील धरण साखळीतून पाणी सोडण्याचे मागणी जोर धरू लागली आहे.
काही दिवसापूर्वी पुणे सोलापूर रोड वर इंदापूर, दौंड या तालुक्यातील असंख्य धरणग्रस्तांनी व मच्छीमारांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. हॉटेल सागर या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.यावेळी राजाभाऊ नगरे, पप्पू भोसले, भैया गायकवाड अशोक गायकवाड, बापू नगरे, अनिल पोटफोडे, कुलदीप झोंड इत्यादी शेतकरी वर्ग व मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply