प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : भिगवन शहर नाभिक संघटनेच्यावतीने व संत सेना महाराज नाभिक संघटनेच्या वतीने अकोले गावचे आमचे स्नेही संतोष पोपट गायकवाड यांची अकोले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल व तसेच प्रमोद नामदेव लोखंडे यांची खानवटे गावच्या विविध सहकारी सोसायटीचे व्हॉइस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकारी तसेच सदस्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भिगवण शहर अध्यक्ष विजय गायकवाड, माजी अध्यक्ष सुधीर लोखंडे, प्रकाश दळवी, आबा साळुंखे, उमेश गायकवाड, विठ्ठल गायकवाड, श्रीकांत काशीद, रमेश गायकवाड, दीपक मोरे ,सार्थक गायकवाड आदि नाभिकबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
नाभिक संघटनेच्यावतीने विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल संतोष गायकवाड यांचा सत्कार

0Share
Leave a reply