राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : गोपनिय माहीती मिळाली की, दिनांक 28/03/2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली की. डीग्रस गावात ग्रामपंचायत परिसरात एक तरुण युवक दक्षिणात्य चित्रपटात दाखवतात तसे एक लोखंडी धातूचे घटक हत्यार घेऊन फिरत आहे. तदनंतर मोमीन आखाडा तालुका राहुरी परिसरात एक इसम हातात तलवार घेऊन दहशत करीत आहे. अशा खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने दोन्ही माहितीबाबत तपास पथकातील अंमलदार यांना बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशित केल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांनी मोमीन आखाडा येथे जाऊन प्रवीण बाबासाहेब कोहकडे वय 19 वर्षे, रा.मोमीन आखाडा, ता. राहुरी जि.अहमदनगर यास ताब्यात घेवून शस्त्र अधिनियम कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
तसेच अजय संतोष पवार राहणार दिग्रस तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यास डिग्रस येथून बातमीप्रमाणे दक्षिणात्य चित्रपटात दाखवतात तशा लोखंडी हत्यारासह ताब्यात घेऊन शस्त्र अधिनियम कलम 4 /25 प्रमाणे स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे , विभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड, राहुल यादव, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल ढाकणे , पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, गोवर्धन कदम, आजिनाथ पाखरे अशोक शिंदे विकास साळवे यांच्या पथकाने केलेली आहे. राहुरी पोलीस स्टेशन मार्फत आव्हान करण्यात येते की अवैध्य शस्त्राबाबत काही माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशनला माहिती कळवावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
दक्षिणात्य चित्रपटातील प्रकारचे घातक शस्त्र व तलवार बाळगणारे आरोपीं राहुरी पोलिसांच्या ताब्यात

0Share
Leave a reply