दौंड तालुका प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : दि.२८. जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची बीज खानोटा गावामध्ये उत्सवात साजरी करण्यात आली, आम्ही जातो आमुचा गावा! आमुचा राम राम तुकाराम बीज, म्हणजे श्री संत तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाचा दिवस .फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराजांचे सदैव वैकुंठ गमन झाले ,असे मानले जाते .हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. तुकाराम साजरी करणे हि साठ वर्षाची परंपरा शेळके व महाडिक या दोन परिवारांनी आजही जोपासली आहे, दिनांक 27 मार्च 20 24 रोजी तुकाराम बीज निमित्त भजन, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भजनामध्ये सचिन महाडिक, राहुल शेळके, आण्णा लोखंडे, केशव माहुरकर, हरिश्चंद्र गुरव, आप्पा घाडगे, सुनील शिरसाट, अरुण भोई, वसंत लोखंडे, योगेश काळे, आयुष दिवेकर, भावना होरणे व भक्ती काळे यांच्या गायनाने मंत्र मुग्ध केले, यांना तबलावादक सुरज कन्हेरकर व नवनाथ गायकवाड यांनी साथ संगत दिली.
यावेळी बबन फरकाळे यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम ची सात लाभली, यावेळी दत्तात्रय भोसले ,माणिक माहुरकर, महेशराजे भोसले, संग्रामराजे भोसले, अमोल जगदाळे, राजेंद्र लोखंडे, राजेंद्र नगरे, राजेंद्र गुरव, आदी श्रोत्यांनी मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी अंकुश महाडिक, विलास शेळके, संजय शेळके, राहुल शेळके, विनोद जराड, अंबादास जराड, बाळू भोसले, चांगदेव गायकवाड, विश्वजीत पवार (ढवळे) गणेश गायकवाड, यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम असे नियोजन केले होते. तसेच गेले साठ वर्ष चालू असलेली परंपरा आयुष्यभर चालू ठेवणार असे मत अंकुश महाडिक, नंदा महाडिक, सचिन महाडिक, सोनाली महाडिक, पल्लवी तोरसे व राहुल शेळके यांनी व्यक्त केली.यामध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी, आभार वृद्ध, महिलांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
Leave a reply