प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्या वतीने शुक्रवार दिनांक २९ मार्च २०२४ रोजी सकाळी सामाजिक उपक्रम घेण्यात आला. साई विठ्ठल अनाथ आश्रम गोखलेवाडी, बेलापूर -दिघी रोड श्रीरामपूर येथे गहू, तांदूळ, दाळी, तेल, आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे मनसे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या प्रेरणेने व सर्व महाराष्ट्र सैनिक,पदाधिकारी यांच्या सहकार्याने देण्यात वाटप करण्यात आले.
यावेळी बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष, डॉक्टर संजय नवथर जिल्हा संघटक, विलास पाटणी उपजिल्हाध्यक्ष, भास्कर सरोदे विधानसभा अध्यक्ष, सतीश कुदळे शहराध्यक्ष, अरमान शेख तालुका अध्यक्ष सहकार सेना, गणेश दिवसे तालुका अध्यक्ष, निलेश सोनवणे तालुका अध्यक्ष रास्ते अस्थापना,महेश सोनी तालुका अध्यक्ष रोजगार सेना,फिरोज सय्यद तालुका अध्यक्ष वाहतूक सेना,अमोल साबणे तालुका अध्यक्ष शेतकरी सेना,प्रवीण रोकडे तालुका अध्यक्ष कामगार सेना,दत्ता राऊत शहर अध्यक्ष रोजगार सेना आदी पदाधिकारी व मनसे सैनिक यावेळी उपस्थित होते.
शिवजन्मोत्सावनिमित्त मनसेच्यावतीने साई विठ्ठल अनाथ आश्रम येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0Share
Leave a reply