दिशाशक्ती श्रीरामपूर / इनायत अत्तार : नायगाव जुने येथील ज्येष्ठ व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ,माजी सरपंच श्री.माधव आनंदा राशिनकर (बाबा) यांचा ८० वा वाढदिवस जुने नायगाव शाळेत शिक्षक,विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ यांच्या समवेत साध्या पद्धतीने साजरा करून वडिलांच्या वाढदिवसानिमित्त राशिनकर परिवाराच्या वतीने त्यांची मुले कचरू राशिनकर,शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष जालिंदर राशिनकर, सुभाष राशिनकर, मुलगी प्रतिभा पुंजाहरी भुसारी, बंधू आसाराम राशिनकर यांनी शाळा विकासासाठी ५,५५१/-रुपयांची देणगी नाऊर आश्रमाचे मठाधिपती चैतन्यानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते शाळेस सुपूर्त केली. तसेच वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांना लापशी व पुलावाचे सुरुची भोजन दिले.
या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम राबविले आहेत.मिशन आपुलकी अंतर्गत शाळेचा होत असलेला विकास व शाळेविषयी कृतज्ञता भावनेतून वाढदिवसाचा हा स्तुत्य उपक्रम शाळेत घेऊन या परिवाराने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असून विद्येसाठी दिलेले दान चिरकाल टिकते असे गौरवोद्गार नाऊर आश्रमाचे मठाधिपती चैतन्यानंदगिरिजी महाराज यांनी काढले. वाढदिवसानिमित्त आर्थिक स्वरूपात दान देऊन शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टीने राशिनकर परिवाराने एक आदर्श निर्माण केला असून या स्तुत्य उपक्रमाची प्रेरणा सर्वांनी घेऊन शाळेस मदत करण्याचे आवाहन मुख्याध्यापक संतोष वाघमोडे व शिक्षिका सुजाता सोळसे यांनी केले.
यावेळी माधवबाबा यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त सरपंच राजाराम राशिनकर,तंटामुक्ती अध्यक्ष सुनील मार्तंड लांडे, सुनिल दातीर, संतोष वाघमोडे,बाबांच्या नाती यांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याची माहिती देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश लांडे,माजी अध्यक्ष संतोष राशिनकर,चेअरमन सुनील प्रकाश लांडे,बापूसाहेब लांडे,चंद्रसन लांडे,नानासाहेब राशिनकर,बाळासाहेब इंगळे,पोलिस पाटील राजेंद्र राशिनकर,भानुदास दातीर,बाबासाहेब लांडे,विलास कदम,राजेंद्र कदम,कैलास अबक, मच्छिंद्र राशिनकर,सुनिल राशिनकर, रामप्रसाद दातीर,नंदू दातीर,विश्वंभर दातीर,दादासाहेब सातव आदि उपस्थित होते.शेवटी सुभाष राशिनकर यांनी वडिलांविषयी आदरभाव व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.
Leave a reply