श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने, श्रीरामपुर उपविभागात श्रीरामपुर व राहुरी तालुका हद्दीत अवैध धंदे करणारे गुन्हेगार, पाहिजे फरार आरोपी तसेच पोलीस स्टेशन अभिलेखावरील शरीराविरुद्धचे, पालाविरुद्धचे व अवैध धंदे करणा-या सराईत गुन्हेगारांवर योग्य त्या कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
सन २०२४ मध्ये माहे मार्च २०२४ अखेर श्रीरामपुर व राहुरी तालुका हद्दीत बेकायदा दारु विक्री करणा-यावर एकुण २५४ केसेस दाखल असुन त्यामध्ये २९,६४,१९९/- रुपये किमतीची ७६६४६.८ लीटर दारु जाप्त केलेली आहे. अवैध जुगार धंदयावर कारवाई करुन एकुण ८२ केसेस दाखल केल्या असुन ३६८३७५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत (एनडीपीएस) एकुण २० केसेस दाखल असुन ७८२००/- रु किमतीचा ७.८४९ कि.ग्रॅ मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अवैध हत्यार बाळगणारे इसमांवर कारवाई करुन भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये एकुण ०३ केसेस करुन ०३ गावठी कट्टे, ०४ काडतुस (किंमत-९२,०००/-) असे हत्यार जप्त करण्यात आले. तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये एकुण १५ केसेस करुन ११ तलवार, ०१ सत्तुर, ०१ रॉड, ०३ कत्ती असे हत्यार जप्त करण्यात आले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु झाले दि. १६/०३/२०२४ पासुन ते दि.०२/०४/२०२४ पावेतो श्रीरामपुर व राहुरी तालुका हद्दीतील पोलीस स्टेशन अभिलेखावरील शरीराविरुद्धचे, मालाविरुद्धचे व अवैध धंदे करणा-या सराईत गुन्हेगारांवर खालीलप्रमाणे एकुण प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशन : श्रीरामपुर शहर,
श्रीरामपुर तालुका, राहुरी, उपविभाग,सीआरपीसी १०७ सीआरपीसी ११० म.पो.का ५५ म.पो.का ५६ म.प्रो.का.९३
तसेच आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने श्रीरामपुर उपविभागातील एकुण २३ इसमांना हद्दपार करण्यात आले असुन एकुण ०२ आरोपींवर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करुन त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. तसेच रेकॉर्डवरील श्रीरामपुर तालुक्यातील १६ पाहिजे आरोपी व ०१ फरार आरोपी पकडण्यात आलेले आहेत. तसेच राहुरी तालुक्यातील ३५ पाहिजे आरोपी व ०४ फरार आरोपी पडण्यात आलेले आहेत. श्रीरामपुर उपविभागात आगामी लोकसभा निवडणुका शांततेत व भयमुक्त वातावरणात व्यवस्थित पार पाडणेकरीता व कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता पोलीसांकडुन वरीलप्रमाणे करवाया करण्यात येत आहेत. सर्व नागरीकांनी कायद्याचे व निवडणुक आदर्श आचारसंहितेचे पालन करुन आगामी निवडणुक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरीता प्रशासनास सहकार्य करावे.
लोकसभा २०२४ निवडणुक अनुषंगाने हददपार करण्यात आलेल्या इसमांची यादी
हददपार इसमाचे नांव :
1) विशाल ऊर्फ अंडया सुरेश सोळसे रा सम्राट जिम जवळ गोधेवणी
2) शहबाज सलीम शेख रा. काझीबाबा रोड वार्ड नं ०१ श्रीरामपुर जि अहमदनगर
3) राहुल विलास शेडंगे बेथेल चर्च जवळ दत्तनगर ता श्रीरामपुर
४) श्रीरामपूर तालुका, शहारुख अफसर शेख रा सुभाष कॉलणी वार्ड ०७ श्रीरामपुर
५) श्रीरामपुर तालुका, हेमंत ऊर्फ दत्तु शेळके रा अम्रपाली वाईन्स मागे श्रीरामपुर
६) श्रीरामपुर तालुका, नाना बाळू गुजांळ रा उक्कलगांव ता श्रीरामपुर
७) श्रीरामपुर तालुका, निसार तालीफ शेख रा अचानक नगर ता श्रीरामपुर
८) श्रीरामपुर तालुका, लुकमान इसाक शहा रा संजयनगर ता श्रीरामपुर
९) श्रीरामपुर तालुका, विकी बबन हमके रा गोधवणी ता श्रीरामपुर
२०) श्रीरामपुर तालुका, जाफर करीम शेख ऊर्फ काकर रा अहिल्यादेवीनगर ता श्रीरामपुर
११) श्रीरामपूर तालुका, नागेश बाळु हासे रा.बजरंग चौक ता श्रीरामपुर
१२) श्रीरामपुर तालुका, नवाज ऊर्फ बिडया राजमहमंद शेख रा सिधी कॉलणी, वार्ड नं १ श्रीरामपुर
१३) श्रीरामपुर तालुका, सागर राहुल गुंजेकर रा राजंणखोल ता राहता जि अहमदनगर
१४) श्रीरामपुर तालुका, विठठल पुजांहरी जाधव रा टाकळीभान ता श्रीरामपुर
१५) श्रीरामपुर तालुका, सागर जग्गनाथ गंगावणे रा जिल्हा बँकंजवळ वार्ड नं ३ श्रीरामपुर
१६) श्रीरामपुर तालुका, पप्पू ऊर्फ डेनियल सुरेश खरात रा खटकळी, बेलापुर ता श्रीरामपुर
१७) श्रीरामपुर तालुका, अस्लम शब्बीर शेख ऊर्फ बंटी जहागीरदार रा मदिनाचौक रोड वार्ड नं ०२ श्रीरामपुर जि अहमदनगर
१८) श्रीरामपुर तालुका, साजीद ऊर्फ मुनचून खालीद मलीक रा पापाजलाल रोड वार्ड नं ०१
१९) श्रीरामपुर तालुका, श्रीरामपुर जि अहमदनगर अरबाज एजाज बागवान रा अहिल्यादेवीनगर वार्ड नं ०२ श्रीरामपुर जि अहमदनगर
२०) राहुरी तालुकाराकेश ऊर्फ जॉकी संजय माळी रा एकलव्य नगर ता राहुरी जि अहमदनगर
२१) राहुरी तालुका, गोरख अशोक बर्ड रा राहुरी खुर्द
२२) राहुरी तालुका, रविंद्र ऊर्फ भोदया सुर्यभान माळी रा बारागाव नांदुर ता राहुरी
२३) राहुरी तालुका, विनायक गणपत बड़े रा.बारागाव नांदुर राहुरी
लोकसभा २०२४ निवडणुक अनुषंगाने एम पी डी ए अतंर्गत कारवाई करण्यात आलेल्या इसमांची यादी
अक्र. पो. स्टे.श्रीरामपुर तालुका, एम पी डी ए अतंर्गत कारवाई करण्यात आलेल्या इसमांची यादी
1) अर्जुन खुशाल दाभाडे रा गोंधवणी वार्ड नं ०१ ता श्रीरामपुर जि अहमदनगर, श्रीरामपुर तालुका,
2) सागर विजय धुमाळ रा गोंधवणी वार्ड नं ०१ ता श्रीरामपुर जि अहमदनगर
श्रीरामपुर उपविभागातील पोलीसांकडुन लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने श्रीरामपूर सह राहुरीच्या आरोपींवर हद्दपारची कारवाई

0Share
Leave a reply