श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर गावातील मस्जीद मध्ये दि.९ एप्रील रोजी नाऊर गावचे उपसरपंच श्री.दिगंबर शिंदे यांच्या मित्र मंडळाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी व जोपासली जावी हिच परमेश्वराकडे अपेक्षा यावेळेस उपसरपंच श्री दिगंबर शिंदे व पंचायत समिती सदस्य श्री विजय शिंदे, नाऊर सोसायटीचे चेअरमन श्री.भास्करकाका शिंदे, प्रतापराव देसाई, माणिकदादा देसाई, आप्पासाहेब राशीनकर, कचरू त्रिभुवन, रावसाहेब भवार, अरुण शिंदे, वसंतराव शिंदे, रामसिंग (भाऊ ) गहिरे, कचरू शिंदे सह आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व सदरील कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Leave a reply