Disha Shakti

सामाजिक

टाकळीढोकेश्वर येथील बनाईदेवी यात्रा उत्सवास उद्यापासून सुरुवात, यात्रा उत्सवाचा आनंद संयमाने घ्या – बाळासाहेब खिलारी

Spread the love

विशेष प्रतिनिधी पारनेर /  वसंत रांधवण :

तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथिल ग्रामदैवत बनाईदेवी यात्रा उत्सवाला गुरुवार दि.११ एप्रिल पासून प्रारंभ होत आहे. हा यात्रा उत्सव १४ एप्रिल पर्यंत चालणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीचे मार्गदर्शक निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमोडे यात्रा कमिटीचे अध्यक्ष विक्रम झावरे, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, मळिभाऊ रांधवण यांनी दिली.


गुरुवार दि.११ एप्रिल रोजी शहावली बाबांचा संदल कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात दारुगोळ्याची आतिषबाजी करण्यात येणार असून दि.१२ सकाळी ८.३० वा बनाईदेवी काठी मिरवणूक रात्री भव्य छबिना मिरवणूक रात्री १० वा देवी समोर जागरण गोंधळाचा कार्यक्रम रात्री ११ वा मनोरंजनासाठी मंगला बनसोडे सह नितीनकुमार बनसोडे लोकनाट्य तमाशा कार्यक्रम होणार आहे. दि.१३ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वा मळगंगा देवीची काठी मिरवणूक आणि दुपारी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात येणार आहे. रात्री ८.३० वा भव्य छबिना मिरवणूक आतिषबाजी मनोरंजनासाठी रात्री १० वा शबनम पुणेकर यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि.१४ एप्रिल रोजी मुक्ताई देवीच्या यात्रेनिमित्त सकाळी ८.३० वा काठी मिरवणूक रात्री भव्य छबिना मिरवणूक रात्री १० वा नटखट सुंदरा ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला आहे. यात्रा उत्सव काळात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात असणार आहे. यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकाने थाटल्याने विविध वस्तू खरेदीचा कार्यक्रम तीन दिवस चालतो तर १४ एप्रिलला यात्रेची सांगता होणार आहे. टाकळीढोकेश्वर परिसरातील सर्वात मोठा हा यात्रा उत्सव असतो.

यात्रा उत्सवाचा आनंद संयमाने घ्या – बाळासाहेब खिलारी

टाकळी ढोकेश्वर मध्ये भरणारा फकिर शहावाली बाबा संदल आणि बनाईदेवी यात्रा उत्सव हा महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम ऐक्याचा अनोखा आविष्कार दाखविणारा यात्रा उत्सव असून आठरापगड जातीचे लोक यामध्ये सहभाग घेतात व आनंद घेत असतात मात्र या यात्रा उत्सावाचा आनंद संयमाने घ्या या यात्राकाळात जर कोणीही गैर कृत्य केले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आपले कुलाचार कुलधर्म आपण आनंदाने साजरा करावा मात्र त्याला गालबोट लागू नये असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष विक्रम झावरे, उपाध्यक्ष सुनील चव्हाण सर, खजिनदार मळिभाऊ रांधवण, सहखजिनदार संपत तराळ, सचिव पत्रकार वसंत रांधवण, पोपट पायमोडे, यात्रा कमिटीचे मार्गदर्शक बाळासाहेब खिलारी, राजेश भंडारी, रावसाहेब झावरे सर, महेश पाटील, जयसिंग झावरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, उपसरपंच रामभाऊ तराळ, भाऊसाहेब झावरे सर,विलास धुमाळ, संजय खिलारी मेजर, बबलू झावरे, सोमनाथ बांडे, शिराज हवलदार, अशपाक हवलदार, गंगाधर बांडे, भास्कर पायमोडे, विकास आल्हाट, युवराज खिलारी, बबनराव सोनबा बांडे, प्रकाश ईघे,बंडूशेठ रांधवण, बबनराव सावळेराम पायमोडे, बबन हरीभाऊ बांडे, संजय कुसकर श्री ढोकेश्वर सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष दिगंबर शेळके यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!