नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : नांदेड लोकसभा निवडणूक 2024 वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अँड.अविनाश भोसीकर यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची नांदेड येथे जाहीर सभा दिनांक 19 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नवा मोंढा मैदान येथे आयोजित करण्यात आली या सभेला लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिणचे जिल्हा उपाध्यक्ष, दीपक माधवराव गजभारे घुंगराळेकर यांनी केले आहे.
नांदेड लोकसभेमध्ये अनेक धन दांडगे उमेदवार रिंगणात उभे असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अँड.अविनाश भोसीकर यांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची सभा आयोजित करण्यात आली आहे एकीकडे भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर तर दुसरीकडे काँग्रेस महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांनी रिंगणात उभे आहेत या दोन पक्ष्यांच्या उमेदवाराला हाणून पाडण्यासाठी व पुन्हा एकदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने व दिलेल्या घटनेच्या अधिकाराप्रमाणे आपण आपल्या मूल्यवान मताचा गैरवापर न करता येणाऱ्या लोकसभेमध्ये श्रद्धेय माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी व लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनाच सिटी या निशाणीवर बटन दाबून विजयी करा असा आव्हान दीपक गजभारे यांनी केले आहे तर या सभेला लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान देखील दीपक गजभारे यांनी केलेले आहे.
अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत 19 एप्रिल रोजी नांदेड येथे होणाऱ्या सभेला लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे दीपक गजभारे यांचं आवाहन

0Share
Leave a reply