राहुरी प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर सूरशे : राहुरी तालुक्यातील म्हैसगांव मधील भिम क्रांती मित्र मंडळ यांच्या विशेष सहकार्याने व प्रयत्नाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवास मध्ये १३ एप्रिल२०२४ सुरुवात होणार असून त्या मध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ येणार आहे सायंकाळी ५ ते ८-३० वा.लहाण मुलांचे डान्स तसेच शाहीर जलसा होणार आहे शनीवारी रात्री ८-३० वा.राहुरी व नगर चा. ऑर्केस्ट्रा स्वर-चांदण्याचे प्रस्तुत- भीम बुद्ध गीतांचा प्रबोधात्मक सुमधुर गीतांचा व भीमसूर्याची संघर्षगाथा रात्री १२ पर्यंत कार्यक्रम होणार आहे.
तसेच १२ वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना २०० तोफांची सलामी होणार आहे. १४एप्रिल २०२४ सकाळी ८:३० वाजता बुद्ध वंदना व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते दिप प्रज्वलन व भाषण तसेच विविध पाच वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम ५ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेंची भव्य दिव्य मिरवणूक काढली जाणार आहे संध्याकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे . या कार्यक्रमासाठी म्हैसगांव , कोळेवाडी , चिखलठाण , दरडगांव थडी’, संगमनेर तालुक्यातील खांबे , या गावातील ग्रामस्थांनी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेण्यात यावा असे आव्हान भीम क्रांती मित्र मंडळने केले आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध विहारवर लाईट डेकोरेशन केली आहे त्याला मोठ्या प्रमाणात शोभा दिसत आहे .
म्हैसगाव येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

0Share
Leave a reply