विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : कसलेल्या पैलवानांकडून एकमेकांवर टाकण्यात येणारे डाव, प्रतीडाव,क्षणा क्षणाला बदलणारे लढतीचे चित्र आणि डोळ्यांची पापणी लवताच लागलेल्या लढतीचा निकाल अशा अनेक चित्त थरारक लढतींनी टाकळीढोकेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्यांचा जंगी हगामा गाजला. टाकळीढोकेश्वर येथील ग्रामदैवत बनाईदेवी यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात राज्यासह परराज्यातील पैलवानांनी हजेरी लावली होती.
वैयक्तिक कुस्त्यांबरोबरच अनेक प्रेक्षणीय कुस्त्यांनी कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, उपसरपंच रामभाऊ तराळ, जयसिंग झावरे, भाऊसाहेब झावरे, शरद झावरे, अंकुश पायमोडे यात्रा कमिटीचे अध्यक्ष विक्रम झावरे , उपाध्यक्ष सुनील चव्हाण सर, सचिव पत्रकार वसंत रांधवण, खजिनदार मळिभाऊ रांधवण, संपतराव तराळ, गंगाधर बांडे, प्रकाश ईघे बंडूशेठ रांधवण, युवक संघटक बबलू झावरे, संजय खिलारी मेजर, पत्रकार शरद झावरे, भाऊसाहेब झावरे सर, रावसाहेब झावरे सर,विलास धुमाळ, आदी मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून कुस्त्यांच्या हगाम्यास प्रारंभ झाला. टाकळीढोकेश्वर गावाला पुर्वीपासूनच कुस्तीची परंपरा आहे.
तालुक्यातील यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गुढीपाडव्याच्या नंतर यंदाच्या हंगामातील पहिल्याच हगामा असल्याने अनेक नामवंत पैलवान या हगाम्यासाठी दरवर्षी हजेरी लावतात. प्रेक्षणीय लढती पाहण्याची पर्वणी मिळणार असल्याने कुस्ती शौकीन टाकळीढोकेश्वरच्या हगाम्यास आवर्जून हजेरी लावतात.
कुस्ती स्पर्धेसाठी यांनी घेतले परिश्रम…
टाकळीढोकेश्वर येथील कुस्ती आखाडा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी उपसरपंच रामभाऊ तराळ, माजी उपसरपंच सुनील चव्हाण,शरद झावरे,पै. विकास आल्हाट,पै. सागर तराळ, मळिभाऊ रांधवण आदींनी परिश्रम घेतले. कुस्तीचे निवड बाळासाहेब खिलारी यांनी केले, प्रकाश ईघे सर यांनी सूत्रसंचालन केले.
Leave a reply