राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : दिनांक 13/ 4/ 2024 रोजी राहुरी शहर व परिसरात पेट्रोलिंग दरम्यान अवैध दारू वाहतूक करणारे 1) कैलास दगडू पाडळे 45 रा. देवळाली प्रवरा हे पत्र्याच्या शेडमध्ये 840 /-रुपये किमतीची 12 देशी बाबी संत्रा कंपनीच्या सीलबंद बाटल्या विनापरवाना बेक कायदा विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आला आहे. 2) विकास शंकर शिंदे रा. केडगाव ता. राहुरी हा 2000/-रुपये किमतीची अंदाजे 20 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू विक्रीकरणाचे उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगताना व विक्री करताना मिळून आला आहे. 3) लक्ष्मण भाऊसाहेब माळी रा.सडे व आदित्य साईनाथ बर्डे वय 20 रा.सडे हे 1500/-किमतीच्या मॅकडॉल नंबर वन 180ml च्या एकूण दहा बाटल्या व व 30000/-रुपये किमतीची हिरो होंडा एचएफ डीलक्स मोटरसायकल नंबर एम एस 17 सी एन 457 सह मुद्देमालासह मिळून आले.
4) मच्छिंद्र भागवत काकडे वय 50 रा. चिकलठाण ता.राहुरी याची कब्जात रुपये 34640 /-रुपये किमतीच्या देशी विदेशी इंग्लिश दारूसह मिळुन आला त्याची शाईन मोटरसायकल एम एस 17 बी जी 438 यावर विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना मिळून आला आहे.
5) महेश नवनाथ भवर रा.झरेकाटी ता. संगमनेर हा बाबा पाण स्टॉल समोर ता.राहुरी येथे विनापरवाना बेकायदेशीररित्या ईरटीका गाडी क्रमांक 21 v89 76 मधून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आला त्याचे कब्जात 12240 रुपये किमतीचा देशी-विदेशी दारू तसेच त्या 300000/- रुपये किमतीची ईरटीगा गाडीसह जप्त करण्यात आला आहे न मोदी इसमाविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. नमूद गुन्ह्याचा तपास पोहेका सुरज गायकवाड, पोहका पारधी,पोहेका वैराळ हे करीत आहेत.
सदरची कारवाई माननीय श्री. राकेश ओला सौ पोलीस अधीक्षक अहमदनगर महा श्री वैभव कुलुवरमे सो अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री पूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वात सपोनी स्वप्नी पिंगळे, सपोनी देवेंद्र शिंदे, पोसई खोंडे, पोसई फडोळ, पोसई धर्मराज पाटील, पोहेका सुरज गायकवाड ,पोहेका राहुल यादव ,पोना बागुल पोका ढाकणे पोका कुराडे पोका भोसले, पोका कदम यांनी सदर कारवाई केली आहे.
देशी विदेशी दारूची वाहतूक करणारे पाच इसम मुद्देमाल व वाहनासह राहुरी पोलिसांच्या ताब्यात

0Share
Leave a reply