विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपुर तालुक्यातील नाऊर येथे महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब यांची १३३ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ. नंदाताई अहिरे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्रा. सोन्याबापू शिंदे, उपसरपंच दिगंबर शिंदे, माजी सरपंच संभाजी शिंदे, सदस्य सौ. स्वाती वाघचौरे, सौ. शिंदे, भाऊ गहिरे, प्रितीष देसाई, राष्ट्रवादीचे फारूख पटेल, किशोर अहिरे,युनुस पटेल , रिपाइ चे जिल्हा सल्लागार अशोक गायकवाड, बशीर पटेल, अशोक गुंड आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपसरपंच दिगंबर शिदे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव फारूख पटेल, शिक्षक सुरेश देसाई, प्रा. एस. आर. शिंदे आदीची भाषणे सुत्रसंचालन व प्रास्ताविक सतिश गायकवाड यांनी केले.
याप्रसंगी संदिप देसाई, शब्बीर पटेल, शरद देसाई, अनिल वावरे, हाजी महंमद पटेल , किशोर त्रिभुवन , किशोर देसाई, सुनिल अहिरे, राजेंद्र देसाई, कुंडलिक त्रिभुवन , बाळू गायकवाड, शरद माळी, दिपक गायकवाड, विलास भवार पत्रकार संदीप जगताप आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान सकाळी सर्व महत्पुरुषांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ६ वा भोजनाचा कार्यक्रम पार पडला. दि. १६ रोजी फटाक्याच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
जयंती यशस्वीतेसाठी विजय गायकवाड,नारायण गायकवाड, राम त्रिभुवन , सुरेश गायकवाड, दिलीप गायकवाड, विकास त्रिभुवन , सुरज गायकवाड, सुमित गायकवाड, दाविद गायकवाड, राहुल गायकवाड राहुल त्रिभुवन , प्रफुल्ल गायकवाड आदीनी परिश्रम घेतले
Leave a reply