राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील शाळेत विद्यार्थ्यांना बससेवा देणारे व पत्रकार जावेद शेख यांनी या वर्षीच्या शाळेच्या शेवटच्या दिवशी आपल्या स्कूलबस मधील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. राहुरी तालुक्यातील नामांकित असलेले सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही तालुक्यातील नावाजलेली संस्था असून या विद्यालयांमध्ये राहुरी तालुक्याच्या अनेक भागातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात ग्रामीण भागातून या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत असे. पालकांनाही रोज शाळेत मुलांना नेऊन आणून सोडणे शक्य होत नसल्याने त्यामुळे जावेद शेख यांनी विद्यार्थी वाहतुकीसाठी स्वतः गाडी घेऊन विद्यार्थी वाहतूक बससेवा चालू केली आहे.
ते नित्यनियमाने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी स्कूल बसची सुविधा उपलब्ध करून दिल्याने या शैक्षणिक संस्थेकडे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विद्यार्थी वाहतूक करणारे काही चालक आपल्या गाडीतील विद्यार्थ्यांची व्यवस्थित काळजी घेत असल्याने पालकांची चिंता कमी झाल्याचे दिसून येत आहे. जावेद शेख यांनी वरवंडी परिसरातील विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाणे येण्यासाठी गाडीची सुविधा उपलब्ध केल्याने अनेक विद्यार्थी ते त्यांच्या वाहनातून घेऊन येण्याचे काम करत आहेत. वर्षभर आपल्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी लागणार असल्याने त्यांना आनंदित करण्यासाठी जावेद शेख यांनी मिठाईवाटप हा उपक्रम सुरू केला आहे .
नुकताच झालेला रमजान ईदचा सन व विद्यार्थ्यांना मिळणारी उन्हाळ्याची सुट्टी या दोन्ही गोष्टींचा संगम साधून जावेद शेख यांनी आपल्या बसमधील मुलांना मिठाई देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीतकेला. शाळेच्या शेवटच्या दिवशी सावित्रीबाई फुले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहीरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे,विद्यालयाचे प्राध्यापक जितेंद्र मेटकर तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खेत्री सर यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले .
यावेळी विद्यालयाचे प्राध्यापक जितेंद्र मेटकर यांनी वाहन चालक हे विद्यार्थ्यांची वाहतूक करत असताना कशी काळजी घेतात हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले .विद्यार्थ्यांनीही वाहन चालक यांचा नेहमी आदर करावा अशाही सूचना विद्यार्थ्यांना दिल्या .जावेद शेख यांनी सुरू केलेल्या या उपक्रमासाठी विद्यालयातील उपस्थित मान्यवरांसहित सर्व विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचे आभार व्यक्त केले.
Leave a reply