राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : श्रीरामनवमी निमित्त मिरवणुक व डिजे यांच्यावर होणारा अनावश्यक खर्च टाळुन शिवधर्म प्रतिष्ठान राहुरी खुर्द यांच्या वतीने गंगाधर बाबा छात्रालय, गुहा येथील अनाथ मुलांना रोजच्या वापरण्यातील आवश्यक वस्तु व खाद्य पदार्थ यांची वाटप करण्यात आली.
या सामाजिक उपक्रमात शिवधर्म प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष अमोलभाऊ जाधव, उपाध्यक्ष सोनुभाऊ पुंधार व निखिल चौभारे, नरेंद्रदादा शेटे, राम तोडमल, प्रदीप पवार, साईनाथ भिसे, पुरूषोत्तम पाटील, सुशील तोडमल, शंतनु घोरपडे, सिध्दार्थ डोळस, गणेश भडांगे, राम कदम, अविनाश तोडमल, महेश घाडगे, शुभम बारस्कर, सुशिल शिंदे, कुणाल शेटे, हर्ष पालवे, ओंकार नजन, शुभम मेहेत्रे, सुरज गुलदगड, प्रितम जाधव, विशाल शेटे, दत्तात्रय शेडगे, अशोक पवार या सर्वांचे सहकार्य लाभले. तसेच सिध्दार्थ डोळस यांनी आश्रमातील मुलांना प्रभु श्रीराम यांच्या आदर्शाची व जीवन कार्याची माहिती दिली.
श्रीरामनवमी निमित्त डिजेचा अनावश्यक खर्च टाळुन शिवधर्म प्रतिष्ठानच्यावतीने गंगाधर बाबा छात्रालय, गुहा येथील अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तु व खाद्य पदार्थाचे वाटप

0Share
Leave a reply