मुंबई कांदिवली / भारत कवितके : कांदिवली पश्चिम, पारेख नगर, एस.व्ही.रोड येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्व साधारण रुग्णालयाच्या आवारात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास त्यांच्या १३३ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन चा कार्यक्रम संपन्न झाला.कांदिवली मधील पंचशील प्रतिष्ठान ट्रस्ट च्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्व साधारण रुग्णालयाच्या आवारात असलेल्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन चा कार्यक्रम करण्यात आला. प्रथम खासदार गोपाळ शेट्टी आमदार योगेश सागर आमदार मनिषाताई चौधरी, गणेश खणकर,यांचे हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले.
संविधानाचे वाचन करण्यात आले.पंचशिल प्रतिष्ठान ट्रस्ट चे विजय पवार यांनी धम्म वंदना म्हटली. मान्यवरांनी व जमलेल्या आंबेडकर प्रेमिनी विनम्र अभिवादन केले.या प्रसंगी मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती सांगितली. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षिका उल्का घाटले, डॉ.गुप्ता, सुरक्षा रक्षक अधिकारी पाटील, पत्रकार साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके,रुग्णांचे नातेवाईक, अनिल चासकर, राधेश्याम वर्मा, रेश्मा टक्के, दिलीप पंडित, निखिल व्यास, बाबा सिंह, नगरसेवक बाळा तावडे, नगरसेविका प्रियंका मोरे, नगरसेविका प्रतिभा गिरकर, नगरसेविका लिना दहेरकर, नगरसेवक कमलेश यादव, नगरसेवक बाळा तावडे,सह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जयंती निमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचशील प्रतिष्ठान ट्रस्ट चे अध्यक्ष संजय बावीस्कर, अशोक कांबळे, विजय पवार, गजानन गव ई बाळू अहिरे, सुनील कदम,व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
कांदिवली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न

0Share
Leave a reply