राहुरी प्रतिनिधी / उमेश बाचकर : राम नवमी हिंदू धर्मातील महत्वाच्या सण आहे, ज्याला भारतात विशेषत : उत्तर भारतात साजरा केला जातो. हा त्या दिवशी हनुमान जन्माला पारितोषिकाने नामकरण केला जातो. राम नवमी हा श्रीरामाच्या जन्माच्या धार्मिक आणि सामाजिक महत्वाचा सण आहे, जो की चैत्र महिन्यातील नवमी दिवशी साजरा केला जातो. हा सण भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्वपूर्ण आहे. या दिवशी, भक्तांनी रामचंद्राच्या मंदिरांत जाऊन आराधना केली जाते आणि पुस्तके, रामायण कथांची वाचन केली जाते. रामनवमीचे औचित्य साधून गोटुंबे आखाडा येथे श्रीराम नवमीनिमित्त बजरंग प्रतिष्ठाण व ग्रामस्थांच्यावतीने मिरवणूक काढण्यात आली होती.
गोटुंबे आखाडा गावाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालण्यासाठी ही गावातील सर्व हिंदू तरुणांच्यावतीने सायंकाळी ७ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरातून पूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी गावातील ठिकठिकाणी अनेक महिलांनी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे औक्षण केले सदरील मिरवणूक गोटुंबे आखाडा येथील बजरंग प्रतिष्ठाण व युवा तरुणांच्यावतीने काढण्यात आली होती.
यावेळी मा.सरपंच सचिन शेटे, मा.उपसरपंच उमेश बाचकर, रवींद्र चौधरी, आण्णासाहेब हरिश्चंद्रे,बिरु ठोंबरे, नंदू हरिश्चंद्रे, बापू पेरणे, गणेश रहाणे, सूरज आसने, रोहित शेटे, प्रशांत पानसंबळ, सनी जाधव, तेजस जगताप, निलेश बीड़गर, राहुल साळुंके, शुभम साठे, कुमार सावंत, संदीप बाचकर, अजय गुंजाळ शिवाजी भोसले, ओम पुरी सह मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.
गोटुंबे आखाडा येथे श्रीराम नवमी बजरंग प्रतिष्ठाण व ग्रामस्थांच्यावतीने उत्साहात साजरी

0Share
Leave a reply