दिशाशक्ती प्रतिनिधी / जावेद शेख : माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी (भंडारदरा डॅम) येथे कार्यरत असलेले शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय ज्येष्ठ शिक्षक शहाजान वजीर मुलानी यांच्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीमध्ये तीस वर्ष प्रदीर्घ सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवापुर्ती समारंभ निमित्त सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला शहाजान मुलांनी सर यांनी आपल्या आयुष्यात काम करत असताना विद्यार्थ्यांना अतिशय तळमळीने अंत:पूर्वक शिक्षण दिले त्याचा आदर्श सर्व शिक्षकांनी घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख यांनी आपल्या भाषणात केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारणी सदस्य शरदराव देशमुख हे होते यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मुलानी सर यांची बैलगाडीवर ढोल ताशांच्या गजरात शेंडी गावातून भव्य मिरवणूक काढली सेवापूर्ती समारंभ निमित्ताने आजी-माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली त्याचबरोबर त्यांचे बालमित्र भिंगारे साहेब यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यकारिणी सदस्य सुधाकरराव आरोटे, आनंदराव नवले, रमेश जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य दिलीप रोंगटे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यादव कोटकर व नीता देशमुख यांनी केले तर आभार महेश पाडेकर यांनी मांडले कार्यक्रम प्रसंगी शेंडी, अंभोळ, कुंभेफळ, मेंहदूरी येथून विविध पालक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे विविध विद्यालयातील शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक बाबाजी वैद्य, प्राचार्य एस.एल. भोर, अनिल गायकर, गोपीशेठ भांगरे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply