श्रीरामपूर विशेष / इनायत अत्तार : दिनांक १९/०४/२०२४ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हा अन्वेषण मोहीम राबवून गॉधवनी वडारवाडा ता. श्रीरामपूर येथे हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापे टाकून अवैध हातभट्टी निर्मिती ठिकाणे नष्ट केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर चे निरीक्षक श्री अनुपकुमार देशमाने यांनी दिली.
सदर कारवाई मध्ये एकूण ०५ गुन्हे नोंद करण्यात आले असून १८०७० ली. कच्चे रसायन व १६२३ ली. हातभट्टी गावठी दारू व हातभट्टी गावठी दारू निर्मितीचे लोखंडी व प्लॅस्टिक बॅरल व इतर साहीत्य नष्ट करण्यात आले आहे. सदर मुद्देमालाची एकूण किंमत रु.९.४७.७७५/- इतका आहे सदर कारवाईत एकूण १० आरोपी वर मुंबई दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद कारण्यात आला आहे.
सदरील कारवाई श्री.डॉ. विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क म.रा मुंबई श्री सागर धोमकर विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग पुणे, श्री. प्रमोद सोनोने, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर श्री प्रवीण कुमार तेली उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क. अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री अनुपकुमार देशमाने निरीक्षक भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर श्री एस.एस. हांडे निरीक्षक कोपरगाव विभाग, श्री.एस.ए. जायव निरीक्षक श्रीरामपूर विभाग, श्री एस. के. सहस्रबुद्धे संगमनेर विभाग श्री जी.एन. नायकोडी दुय्यम निरीक्षक, श्री एन.बी. पालवे दुय्यम निरीक्षक भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर श्री.वाय.बी. पाटील दुय्यम निरीक्षक, श्री.सी.एस. रासकर द्व्यम निरीक्षक, श्री. आर. टी. डावरे दुव्यम निरीक्षक, श्री आर ए घोरपडे. श्री रायचंद गायकवाड दुय्यम निरीक्षक श्री दिवाकर वाघ दुय्यम निरीक्षक कु. प्राची देखणे दुय्यम निरीक्षक श्री के. के. शेख सहा. दुय्यम निरीक्षक, श्री एस.डी. साठे सहा. दुय्यम निरीक्षक, श्री ए. के. शेख सहा. दुय्यम निरीक्षक, श्री.टी.आर.शंख जवान, श्री एन आर ठोकळ, श्री शुभम लवांडे व महिला जवान श्रीमती एस. आर. फटांगरे श्रीमती वयां जाधव, श्रीमती पूनम आर श्री एन.एम. शेख, श्री संपत बिटके, श्री सुशांत कासुळे, श्री विजय पाटोळे जवान नि वाहन चालक यांनी सहभाग घेतला आहे. अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती व विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्यानं कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्री अनुपकुमार देशमाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र २ श्रीरामपूर यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाकडून गोंधवनी वडारवाडा येथील गावठी हातभट्टी केली नष्ट

0Share
Leave a reply