बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : भाजप-महायुतीचे नांदेड लोकसभेचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट जाहीर सभा शनिवार दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 9:00 वाजता मोदी ग्राऊंड, शिवरत्न जिवाजी महाले चौक (मामा चौक) असर्जन रोड, कौठा येथे आयोजित करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी येणारा लाखोंचा जनसमुदाय लक्षात घेता सभास्थळी विशाल सभामंडप व भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. शिवाय महिलांसाठी विशेष आसन व्यवस्था करण्यात आली असून उन्हाची तीव्रता लक्षात घेता सभास्थळी सुरक्षित आसरा व पाण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पालकमंत्री गिरीश महाजन,खा. अजित गोपछडे, यांच्यासह राज्यातील व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती राहणार आहेत.
नरसी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विक्रमी जाहीर सभेनंतर नांदेड लोकसभा मंतदारसंघात संपूर्ण भाजपमय वातावरण निर्माण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अतिवराट जाहीरसभा होणार असल्यामुळे या सभेसाठी नांदेडवासीय उत्सूक आहेत. सभेला मोठ्या संख्येने उपस्थितत रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सभेला हजारोच्या संख्येने उपस्तीत राहावे – लक्ष्मण ठक्करवाड

0Share
Leave a reply