Disha Shakti

राजकीय

खासदार विखे यांच्या प्रचारार्थ टाकळी ढोकश्वरमध्ये आज मेळावा

Spread the love

पारनेर विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : सुजित पाटील झावरे मित्रमंडळ आणि देवकृपा प्रतिष्ठान यांच्यावतीने टाकळी ढोकेश्वर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य सुप्रिया अमोल साळवे यांनी दिली. महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी दि. २१ एप्रिल रोजी टाकळी ढोकेश्वर बाजार तळ येथे आयोजित करण्यात आला असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

खासदार सुजय विखे पाटील यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामे व समाजहिताचे राजकारण यामुळे त्यांना लोकसभेला ताकतीने पाठिंबा द्यायचा निर्णय या आधीच तालुक्याचे नेते सुजित पाटील झावरे यांनी पारनेर येथील कार्यकर्ता मेळाव्यात घेतलेला आहे. त्यामुळे खासदार सुजय विखे पाटील यांना सर्वांधिक मतांनी विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते, सहकारी यांनी कंबर कसली आहे. याच भूमिकेवर येत्या रविवारी सुजित पाटील झावरे यांच्या नेतृत्त्वाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मागील पाच वर्षात खा. सुजय विखे पाटील यांनी केंद्र, राज्य सरकार व जिल्हा परिषद चा मोठा निधी टाकळी गटासाठी दिलेला आहे.

पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वयोवृद्धांना सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ मिळाला आहे. महिला बचत गट सक्षमीकरण या सारख्या कोट्यवधी रुपयांचे कामे व योजना टाकळी गण व गटात सुजय विखे पाटील व सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून झालेली आहेत. यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत पारनेर तालुक्यातून सर्वाधिक विक्रमी मतांचे लीड सुजय विखे पाटील यांना भेटणार असून आयोजित मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समिती सदस्या सुप्रिया साळवे यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!