पारनेर प्रतिनिधी / वसंत रांधवण : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी स्थानिक पदाधिकार्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
नीलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात साधेपणाने दाखल करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी कुटुंबियांचे आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास रवाना झाले. त्यानंतर नगरमध्ये मानाच्या श्री विशाल गणपती मंदिर येथे आरती करुन दर्शन घेतले. तसेच सर्जेपुरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी महाविकास आघाडीच्यावतीने त्यांना गदा भेट देण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर स्थानिक पदाधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल केला.
म्हणून साधेपणाने अर्ज दाखल
सध्या उष्णता फार जास्त असल्याने कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी उन्हामध्ये येण्याचा त्रास देणे हे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे साधेपणाने अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे लंके म्हणाले.
आमदार नीलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल, स्थानिक पदाधिकार्यांच्या उपस्थितीत साधेपणाने अर्ज दाखल

0Share
Leave a reply