Disha Shakti

सामाजिक

दौंड तालुक्यातील खानवटे येथे हनुमान जयंती उत्सवात साजरी

Spread the love

दौंड प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : दि.२३ एप्रिल रोजी दौंड तालुक्यातील खानवटे येथे हनुमान जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान!! अशा भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती मौजे खानवटे येथे संपन्न झाली, त्यानिमित्त भजनामध्ये केशव माहुरकर, शंकर नवले, आप्पा घाडगे, माणिक माहुरकर, सचिन महाडिक, वसंत लोखंडे, नवनाथ गायकवाड, सुनील शिरसाट, भाऊ पानसरे, भावना होरणे या सर्वांच्या गायनाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमासाठी अर्जुन शिरसट, भीमराव पवार , माधव खुटाळे, दत्तात्रय भोसले, बाळू भोसले, रवींद्र ढवळे व इतर सर्वांनी कार्यक्रमाचे उत्तम असे नियोजन केले, राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की, या जयघोषाने परिसरातील आसमंत दुमदुमला. तसेच सालाबाद प्रमाणे खानवटे गावचे मा.उपसरपंच श्री हनुमंत (काका) पांडुरंग पवार (ढवळे) यांनी महाप्रसादाचे नियोजन केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!