राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : दिनांक 23/ 4/ 2024 रोजी राहुरी शहर व परिसरात पेट्रोलिंग दरम्यान अवैध दारू वाहतूक करणारे 1) गोरक्षनाथ मोहन देठे वय 29 वर्ष, 2) दगडू पाराजी वाणी वय 43 वर्ष दोन्ही राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर राहुरी येथे विनापरवाना बेकायदेशीररित्या महिंद्रा कंपनीची एस यु व्ही 500 कार तिचा क्रमांक एम एच 17 बी व्ही 7191 या वाहनां मधून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आले. त्यांचें कब्जातून एकूण 22,800/- ₹ किमतीची देशी विदेशी दारू तसेच 5,00,000/- रुपये किमतीची एस यु व्ही 500 गाडी असा एकूण 5,22,800/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद इसमाविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्याचा तपास पोहेका यादव हे करीत आहेत.
सदरची कारवाई माननीय श्री. राकेश ओला सो, पोलीस अधीक्षक अहमदनगर, माननीय श्री वैभव कलुबर्मे सो अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, माननीय श्री बसवराज शिवपूजे सो,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पो नि संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वात सपोनी पिंगळे , ASI गीते, पोहेका सुरज गायकवाड ,पोहेका राहुल यादव ,शिंदे, पोहका पारधी,पोहेका वैराळ, ठाणगे, पोना बागुल पोका ढाकणे पोका कुराडे पोका भोसले, पोका कदम आजीनाथ पाखरे, सम्राट गायकवाड, अमोल गायकवाड, बडे यांनी सदर कारवाई केली आहे.
Leave a reply