Disha Shakti

राजकीय

राहुरी येथे आज निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या प्रचार सभेचे आयोजन

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : नगर दक्षिण चे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ राहुरी येथे दि. २५ एप्रिल २०२४ रोजी शरदचंद्र पवार यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. सभेची जोरदार तयारी झाली असून या सभेकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार आमदार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या उपस्थितीत दि. २५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता शहरातील पाण्याची टाकी परिसरात माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या संपर्क कार्यालया जवळ प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या स्टार प्रचारक असल्याने प्राजक्त तनपुरे हे जिल्ह्यासह राज्यात सर्वश्रूत झाले आहे. त्यांचे कार्य, मुद्देसूद व अभ्यासू भाषण तसेच विरोधकांवरील संतुलीत टिकामुळे ते राज्यात प्रकाश झोतात आहेत. त्यांच्या भाषणाकडे सर्वांचेच लक्ष लागून असते. नगर जिल्ह्यात प्राजक्त तनपुरे हे स्टार प्रचारक असल्याने लोकसभेसाठीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आमदार निलेश लंके यांच्या लोकसंवाद यात्रेत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी रात्रंदिवस एक करुन किंग मेकरची भूमिका बजावत आहे. निलेश लंके यांनी काल नगर येथे लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज भरला. शरद पवार यांच्या उद्या होणाऱ्या प्रचार सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नगर दक्षिण मध्ये शरद पवार यांना मानणारा एका मोठा गट आहे. आमदार निलेश लंके यांना निवडून आणण्यासाठी आणि विखे यांना शह देण्यासाठी शरद पवार हे कशा पद्धतीने व्युहरचना करणार. याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. मागील विधानसभा निवडणूक वेळी आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी राहुरी शहरात घेतलेली प्रचार सभा निर्णायक ठरली होती. तेव्हा प्राजक्त तनपूरे भरघोस मतांनी विजयी झाले होते. आता आमदार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ उद्या राहुरी शहरात प्रचार सभेचे आयोजन झाले असून ही प्रचार सभा निलेश लंके यांच्या वियजासाठी निर्णायक सभा ठरणार असल्याची चर्चा तालूक्यात सुरु आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!